एक्स्प्लोर
Mumbai Local: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; लोकलच्या दिवसाला अतिरिक्त 300 फेऱ्या वाढणार, पाहा A टू Z माहिती
Mumbai Local: मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.
Mumbai Local
1/7

एकूण 16 हजार 400 कोटी खर्चाच्या या प्रकल्पांमुळे मुंबई उपनगरी रेल्वे अधिक वेगवान आणि प्रवासीसंख्या हाताळण्यासाठी सक्षम होणार आहे.
2/7

मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्याने या इलेक्शन बजेटकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.
3/7

मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील. मुंबईत विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं सांगितलं जातंय. याआधी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
4/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेकरिता तब्बल 23 हजार 778 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
5/7

मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून, दिवसाला 300 अतिरिक्त लोकत फेऱ्या वाढणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
6/7

बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका, कुर्ला-सीएसएमटी पाचवी-सहावी मार्गिका, तसेच पनवेल-कर्जत उपनगरी कॉरिडॉर यासारख्या 301 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
7/7

सध्या दिवसाला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 3000 लोकल फेऱ्या धावत आहेत. यामध्ये दहा टक्के क्षमता वाढ होणार आहे.
Published at : 04 Feb 2025 07:37 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























