City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस, आरोपींच्या हत्येबाबाबत आलेल्या मेसेजचे पुरावे देण्याच्या सूचना. तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांनी केला होता दावा
बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसंच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
फरार आरोपींमध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे का?, कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीसांना सवाल
आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात एक्स पोस्ट केल्याने रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद, आव्हाड समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चॅट ठोंबरेंकडून पोस्ट.
बीडमधली घटना गंभीर, मुख्यमंत्री दोषींना सोडणार नाहीत, मुख्यमंत्र्यांसमोर कोणीही डावं उजवं नसतं, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये, भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत
नाराज कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा प्रयत्न, आयुष्यात धुकं येतं पण हे धुकं पर्मनंट नसतं, मुनगंटीवारांचं वक्तव्य. मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्ते होते नाराज
आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट, शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनीही घेतली शरद पवारांची भेट
येणाऱ्या काही दिवसात राहुल गांधी शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगाकडे जाणार, त्यासंदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याची उत्तम जानकरांची प्रतिक्रिया,
सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळीची महिला आयोगाकडे तक्रार, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार, अभिनेत्री प्राजक्ता माळीची माहिती.