(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bala Nandgaokar Vidhansabha Planning : 200 ते 250 विधानसभा जागा लढण्याची मनसेची तयारी
आगामी विधानसभेसाठी आमची युतीसाठी कोणाशीही चर्चा सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे”, अशी प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. “ज्या मतदरासंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मतं मिळाली आहेत, त्या मतदारसंघात आम्ही निश्चित आमचे उमेदवार देऊ. त्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. मनसेचे पदाधिकारी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतील, तसेच त्यासंदर्भातील अहवालर राज ठाकरेंना सादर केला जाईल”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मनसे विधानसभा स्वबळावर का? असं विचारलं असता, “पुढे काय होईल हे आता सांगता येणार नाही. मात्र, आम्हाला तयारी तर करावीच लागेल. प्रत्येक जण हा आपला पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यानुसार आम्हीसुद्धा आमचा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करतो आहे”, असं ते म्हणाले.