Rahul Kulkarni 417 मधली ओळ : बेरोजगारीचे कथन! लोकसभेत घुसलेल्या अमोल शिंदेची धक्कादायक INSIDE STORY
अमोलने जे काही केलं ते बेरोजगारीच्या कारणामुळं केलं, त्याने सैन्य भरतीचे सहा वेळा प्रयत्न केले होते आणि त्याने रनिंगची चँमिपयनशिपही जिंकली आहे अशी माहिती अमोल शिंदेच्या (Amol Shinde) लकांनी दिली आहे. अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.
गुणवत्ता असून ही मुलास नोकरी नाही मिळाली. रोजगारी करणाऱ्या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का असा प्रश्न धनराज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मुलाशी बोलणे नाही झाल्यास मी आत्महत्या करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
पोलीस आणि मिल्ट्री भरतीची आस असलेल्या तरुण, मागील अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता पण हाती निराशा आलेली. आम्ही नवरा बायको दोघेही काम करतोय. त्याला वेळोवळी पैसे दिले होते. देशातील अनेक ठिकाणी जात अमोलने भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र हाती काही लागले नाही. त्याने काय केले हे पोलीस आल्यावर कळाले. आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं. माझं पोरगं वापस नाही आले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिली आहे.