Latur : लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ
पहिल्याच पावसात रेणा मध्यम प्रकल्पात तब्बल 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ.... रेणा नदीवरील चार बंधारे पाणी संचय पातळी वरून वाहत आहेत... नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा, लातूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून दररोज पावसाची हजेरी आहे... मात्र काल संध्याकाळी झालेल्या पावसाने संपूर्ण चित्रच बदलून टाकला आहे... रीना मध्यम प्रकल्पात मूर्तसाठ्याच्या खाली पाणी गेलं होतं... मात्र काल आणि आज मिळून मूर्तसाठ्यापेक्षा वीस ते बावीस टक्के पाणीसाठा वाढला आहे.... रेना नदी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई यातील घाटात उगम पावते... लातूर जिल्ह्यातील भंडारवाडी येथे या नदीवर मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे.... इथून पुढे ही नदी मांजरा नदीला जाऊन मिळते... या नदीवर चार बंधारे बांधण्यात आले आहेत...
रेणा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लातूर, जिल्ह्यात 10 जून 2024 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारा येथील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्यावर गेली आहे. त्यामुळे रेणा नदी काठावरील गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान केंद्राद्वारे मुसळधार पावसाचा इशारा प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरील गावातील नागरीक, शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहिलेले नागरिक यांना लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.