(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Marathwada Visit : राज ठाकरेंचा लातूर दौरा; जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार
Raj Thackeray Marathwada Visit : राज ठाकरेंचा लातूर दौरा; जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार
हेही वाचा :
मुंबईतील (Mumbai News) प्रभादेवीत शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) पुन्हा आमनेसामने आला. फूटपाथवर लावलेल्या बोर्डावरील धनुष्यबाणाचं चिन्ह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काढल्याचा आरोप शिंदे गटानं केला आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी स्वखर्चातून बोर्ड बसवल्याचा दावा शिंदे गटानं (Shinde Group) केला आहे. मात्र, सत्तांतरानंतर इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. त्यातच ठाकरे गटानं अहुजा टॉवर इथल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह हटवल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मुंबईतील प्रभादेवीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभादेवी भागात फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्यानं स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.