(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Panchganga River : कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर? पंचगंगेत एक इंचाने पाणी वाढल्यास...
Kolhapur Panchganga River : कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर? पंचगंगेत एक इंचाने पाणी वाढल्यास...
Kolhapur Rain News : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं (Panchganga river) धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरु
कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. एका स्वयंचलित दरवाजा मधून सुमारे 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.