Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा
कोल्हापूर - एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे.. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला... त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते... मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले....पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले... अंत्यविधीची तयारी झाली... रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला... त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली... नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले....आणि आज पांडुरंग उलपे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत... ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत....