Shaheen Afridi : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून धुलाई, एका षटकात ठोकल्या 24 धावा
Shaheen Afridi : ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहोचलाय. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धही पाकिस्तानचा फ्लॉप शो सुरुच आहे.
Shaheen Afridi : ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहोचलाय. पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धही पाकिस्तानचा फ्लॉप शो सुरुच आहे. पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शाहीन आफ्रीदीची चांगलीच धुलाई केली. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलनने शाहीनच्या एकाच षटकात 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 24 धावा ठोकल्या आहेत.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेत पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकने पहिल्याच षटकात विकेट पटकावली. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शाहीन आफ्रिदीची चांगलीच धुलाई केली.
न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलनने तिसऱ्या षटकात सलग 5 चेंडू मैदानाबाहेर मारले. याच षटकातील पहिल्या चेंडूवर अॅलनने शाहीनला षटकार लगावला होता. त्यानंतर फिन अॅलने सलग 3 चौकार लगावले. तर पाचव्या चेंडूवर देखील त्याने षटकार लगावत आफ्रदीची धुलाई केली.
शाहीन आफ्रीदीशिवाय पाकिस्तानच्या इतर गोलंदाजांचीही चांगलीच धुलाई झाली आहे. आफ्रीदीनंतर आणखी एका गोलंदाजाविरोधात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना आपल्या अष्टपैलू कामगिरी चमक दाखवणाऱ्या अमिर जमालने एका षटकात 20 धावा दिल्या. केएम विल्यमसन आणि डेरेल मिचेलने त्याच्या विरोधात आक्रमक फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 ने धुरळा उडवला
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. 29 वर्षांनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. 1995 मध्ये त्यांनी येथे शेवटचा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत 5 सामने जिंकले आहेत. त्याला 2 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. विजयाची टक्केवारी 56.25 इतकी आहे. कांगारू संघाचे 54 गुण आहेत. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 54.16 आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 2 टक्के कमी आहे. या कालावधीत भारताने 4 सामने खेळले असून 2 सामने जिंकले आहेत. एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2 सामने खेळले आहेत. या कालावधीत एक सामना जिंकला असून एक सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 50 आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेश सध्या पाचव्या स्थानावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या