Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक विक्रमाची नोंद, शून्यावर बाद झाल्यावरही हिटमॅनचं 'शतक' पूर्ण
IND vs AFG : मोहालीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, तरीही त्यानं खास शतक पूर्ण केलं आहे.
Rohit Sharma Run Out : मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 (T20 Saries) सामन्यामध्ये भारताने अफगाणिस्तानचा (India va Afghanistan) 6 विकेट्सने पराभव केला. भारत आणि अफगाणिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा खाते न उघडताच धावबाद झाला. शुभमन गिल आणि रोहित यांच्यात झालेल्या गोंधळामुळे टीम इंडियाला ही विकेट गमवावी लागली. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, पण त्याने टी20 मध्ये खास शतक पूर्ण केलं आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक विक्रमाची नोंद
रोहित शर्मा 14 महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर टी-20 संघात पुनरागमन करत असताना सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रमही नोंदवला गेला आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने असा विक्रम केला नाही. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला खेळाडू आहे.
रोहित शर्माचं खास 'शतक' पूर्ण
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शून्यावर धावबाद झाला, पण तरीही रोहित शर्माने खास शतक पूर्ण केलं आहे. रोहित शर्मा 100 व्या टी-20 मध्ये भारतीय संघाचा भाग होता, ज्यामध्ये संघ विजयी झाला होता. अशा प्रकारे रोहित शर्माने 100 टी-20 सामन्यामध्ये संघाचा भाग असण्याचं खास शतक पूर्ण केलं आहे.
India defeated Afghanistan by 6 wickets.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 11, 2024
Shivam Dube is the hero with 1/9 and 60* (40) - a comeback to remember for Dube...!!! 👏🫡 pic.twitter.com/PBW0I0xdzL
'हिटमॅन'ची खास कामगिरी
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक 100 विजय मिळवणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 149 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी 100 जिंकले आहेत. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या नावे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे. पाँटिंगने 108 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याच्या संघाला विजय मिळाला आहे.
Rohit Sharma has 40 wins from just 52 games in T20I as a captain 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) January 12, 2024
- One of the most successful captains in T20I history. pic.twitter.com/Tpas68JN4M
एरॉन फिंचच्या विक्रमाशी बरोबरी
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात रोहित शर्मा या सामन्यात शून्यावर बाद झाला, पण त्याने कर्णधार म्हणून T20I मध्ये 40 वा विजय नोंदवून एरॉन फिंचच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय या विजयासह रोहित शर्माने T20I मध्ये अनोखं शतक झळकावण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विजय मिळविणारे खेळाडू
कसोटी : रिकी पाँटिंग (108)
एकदिवसीय : रिकी पाँटिंग (262)
टी20 आंतरराष्ट्रीय : रोहित शर्मा (100)