'देवेंद्र फडणवीसांचा सगळी सत्ता स्वत:च्या हातात हवीय, त्यामुळेच..'हर्षवर्धन सपकाळांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरून फटकारले
देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचं विकेंद्रीकरण नको असून त्यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे. असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवरून हर्षवर्धन सपकाळांनी टीका केलीय.

Harshvardhan Sapkal: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार ? याची एकच चर्चा आहे .बहुतांश पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे .दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे .त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय .उल्हासनगर शहरात कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आले होते .यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारलं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सत्तेचा विकेंद्रीकरण नको आहे असं ते म्हणाले होते . (Harshawardhan Sapkal)
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे. त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला आहे.
हर्षवर्धन सकपाळ हे आज उल्हासनगर शहरात कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते. यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारलं असता, देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचं विकेंद्रीकरण नको असून त्यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसून सध्या सगळीकडे अधिकारी राज आहे, या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट फोन येतो, असं वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ यांनी केलं.
कर्जमाफीवरून दादांना फटकारलं
राज्यातील शेतकऱ्यांना आताच कर्जमाफी देऊ शकत नाही या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळांनी हल्लाबोल केला होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेनं राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलीय. X माध्यमावर त्यांनी याबाबत पोस्ट केली होती.
स्थानिक निवडणुकीचं स्टेटस काय?
राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असून या प्रकरणावर पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासनच कारभार पहात असून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये गेल्या 3-4 वर्षांपासून निवडणूका झाल्या नाहीत. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका झाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी लागणार याकडे लक्ष असून पावसाळ्यानंतर या निवडणूका होण्याची शक्यता आहे.
हेही पहा























