एक्स्प्लोर

Aditi Ashok : अवघ्या देशाचं लक्ष अदितीकडे, गोल्फमध्ये दमदार कामगिरी करणारी अदिती अशोक आहे तरी कोण? जाणून घ्या प्रवास 

Aditi Ashok :  भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकची अंतिम फेरीत दमदार खेळी सुरु आहे.  गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारतीय खेळाडूची ताकद अभिमानास्पद आहे.

Aditi Ashok in Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अदिती अशोक या खेळाडूनं भारताकडून दमदार खेळी करत या खेळ प्रकारात भारताला पदकाच्या जवळ नेलं आहे.  भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकची अंतिम फेरीत दमदार खेळी सुरु आहे.  गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारतीय खेळाडूची ताकद अभिमानास्पद आहे. अदिती अशोकच्या या कामगिरीमुळं गोल्फ प्रकाराकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. 

कोण आहे अदिती अशोक
29 मार्च 1998 रोजी जन्मलेली अदिती अशोक ही भारतीय गोल्फ खेळाडू आहे.अदितीचा जन्म बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून गोल्फचे आकर्षण असलेली अदिती कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या हिरव्यागार  गोल्फ कोर्सवर सराव करायची. आपल्या वडिलांसोबत अदिती या गोल्फ  कोर्सवर जायची , जिथे ती लवकरच गोल्फमध्ये कुशल झाली. अदितीचे वडील पंडित गुडलामानी अशोक हेच तिचे कॅडी आहेत.  एकीकडे फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण आणि दुसरीकडे गोल्फ कोर्सवर सराव, अशी दुहेरी कसरत अदिती करत होती. पुढे ती स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. 

Tokyo Olympics 2020 LIVE : सलग आपलं दुसरं स्थान कायम ठेवण्यात अदिती यशस्वी, गोल्फमध्ये भारताला पहिलं पदक मिळण्याची शक्यता

रिओ ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व 
अदितीने रिओ ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. रिओमध्ये  अदिती अशोकला 41व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिकमध्ये 112 वर्षांनी पुनरागमन केलेल्या गोल्फमध्ये त्यावेळी केवळ 18 वर्षाची असलेल्या अदितीने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.  या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती सर्वात लहान खेळाडू होती. 

अदितीनं गाजवल्या या स्पर्धा 
अदितीनं उन्हाळी कर्नाटक ज्युनिअर, दक्षिण इंडिया ज्युनियर, फाल्डो मालिका आशिया - भारत, ईस्ट इंडिया टॉली लेडीज, ऑल इंडिया चॅम्पियनशिप २०१२:- यूएचएचए दिल्ली लेडीज, यूएसएचए आर्मी चॅम्पियनशिप, ऑल इंडिया ज्युनियर 2013 :- आशिया पॅसिफिक ज्युनियर चॅम्पियनशिप 2013 :- ईस्टर्न इंडिया लेडीज ॲमेच्यूर, यूएसएचए इगू ऑल इंडिया लेडीज ॲंड गर्ल्स चॅम्पियनशिप 2014 :- सेना लेडीज आणि कनिष्ठ चॅम्पियनशिप, सेंट रुल ट्रॉफी, साउथर्न इंडिया लेडीज आणि ज्युनियर गर्ल्स चॅम्पियनशिप, महिलांमध्ये ब्रिटीश ओपन एएमयू स्ट्रोक प्ले चॅम्पियनशिप, थायलंड एमेच्योर ओपन या स्पर्धा गाजवल्या आहेत. 

या मोठ्या स्पर्धा जिंकल्या 

अदितीने 2011 मध्ये 13 वर्षांची असताना कर्नाटक ज्युनियर आणि दक्षिण भारतीय ज्युनियर या दोन चॅम्पियनशिपमध्ये पहिली राज्यस्तरीय जेतेपदे पटकावली. याच वर्षी तिने राष्ट्रीय हौशी गोल्फ स्पर्धा जिंकली. पुढच्या तीन वर्षात - 2012, 2013 आणि 2014 मध्ये तिने राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा जिंकल्या. 2014 मध्ये तिने कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्पर्धांची जेतेपदे पटकावली. 2013 मध्ये झालेले एशियन युथ गेम्स, 2014च्या युथ ऑलिम्पिक आणि 2014च्या एशियन गेम्समध्ये खेळणारी ती एकमेव भारतीय गोल्फर ठरली. आपल्या प्रभावी हौशी कारकीर्दीच्या शिखरावर असताना 2015 मध्ये अदितीने लेडीज ब्रिटिश हौशी स्ट्रोक प्ले चँपियनशिपचे  अजिंक्यपद पटकावले. त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून तिने व्यावसायिक गोल्फपटू म्हणून खेळण्यास सुरुवात केली. 2016 ऑक्टोबरमध्ये अदितीने पहिल्यांदा लेडीज युरोपियन टूर (LET) जिंकली. हा विजय तिची होम टूर्नामेंट असलेल्या वुमेन्स इंडियन ओपन स्पर्धेत तिला मिळाला होता त्यानंतर अदितीने कतार लेडीज ओपन स्पर्धाही जिंकली आणि तिला ‘एलईटी रूकी ऑफ द ईअर' हा पुरस्कार देण्यात आला. 2017च्या गाजलेल्या अमेरिकन दौर्‍यामध्ये LPGA (द लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन) टूर कार्ड मिळविणारी ती पहिली भारतीय ठरली. अदितीने 2018 मध्ये 24 आणि 2019 मध्ये 22 स्पर्धा खेळल्या. यात दोन वेळा ती पहिल्या दहामध्ये होती, ज्यापैकी एक व्होलंटिअर्स ऑफ अमेरिका LPGA टेक्सास क्लासिक ही स्पर्धा होती. 

(या लेखातील काही माहिती विकिपीडियावरुन घेतली आहे) 

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget