Tokyo Olympics 2020 LIVE : नीरज चोप्राचा 'सुवर्णवेध', टोक्यो ऑलिम्पिक भालाफेकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत देशासाठी पहिलं गोल्ड मिळवलं
Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येक घडामोडींसाठी क्लिक करा...

Background
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले.
Ravi Dahiya Wins Silver: रवी कुमार दहियाची 'सुवर्ण'संधी हुकली, रौप्य पदकावर समाधान
Tokyo Olympics 2020 : भारताला टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. कुस्तीमध्ये पैलवान रवि दहियाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीत रवि दहियानं पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं रौप्यपदक जिंकले आहे.
रवि कुमार दहियाचा सामना रूसीचा पैलवाना जवुर यूगेव सोबत होता. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी चार कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पैलवान रवि दहियाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "रवि कुमार दहिया एक उत्कृष्ट पैलवान आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला त्यांचा अभिमान आहे."
IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब
IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. अटी-तटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकानं पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. जर्मनीनं सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच गोल डागल 1-0 नं आघाडी घेतली होती. जर्मनीच्या वतीनं तिमुर ओरुजनं गोल केला होता. भारताला पाचव्या मिनिटाला वापसी करण्याची संधी मिळाली. पण पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात रुपिंदर पाल सिंह अयशस्वी ठरला.
नीरज चोप्रा.. पाचवा प्रयत्न फाऊल
नीरज चोप्रा.. पाचवा प्रयत्न फाऊल
चौथ्या फेरीसाठी नीरज सज्ज, चौथा प्रयत्न फाऊल
चौथ्या फेरीसाठी नीरज सज्ज, चौथा प्रयत्न फाऊल




















