CWG Priyanka wins silver : प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक, 10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय
Commonwealth Games 2022 : भारतीय खेळाडू प्रियांका गोस्वामी हीने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमीचं अंतर पूर्ण करत रौप्यपदक पटकावलं आहे.
CWG 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतानं आजच्या दिवशीचं पहिलं पदक मिळवलं आहे. भारताची अॅथलीट प्रियांका गोस्वामी हीने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे. प्रियांकाने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केलं असून ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
अविनाशनेही जिंकलं रौप्यपदक
प्रियांका पाठोपाठ महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने (Avinash Sable) बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गोस्वामीने 10 किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं. ज्यानंतर आता अविनाशनेही रौप्य जिंकलं आहे
हे देखील वाचा-