एक्स्प्लोर

Maharashtra Kesari : शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित, पंचासोबत हुज्जत घालणं भोवलं 

Maharashtra State Wrestling Association : शिवराज राक्षेने पंचांना शिवीगाळ करत लाथ मारली होती. तर महेंद्र गायकवाडनेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवीगाळ केली होती. 

अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) चांगलंच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने (Maharashtra State Wrestling Association) घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली. 

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. 

तीन वर्षे कुस्ती खेळता येणार नाही

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम म्हणाले की, "पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचं कृत्य केलं. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारं नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे."

Shivraj Rakshe Video : शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली 

मॅट विभागामधून महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा  सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे या चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ  मारल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं.  

महेंद्र गायकवाडची नाराजी

दुसरीकडे, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण दिल्यानंतर त्याविरोधात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप पंचांनी केला. तसेच महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. 

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या कृत्याचा सर्व पंचांनी निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत या दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
बेरोजगार तरुणांऐवजी चक्क कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे जमा, महायुती सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठा घोटाळा
बेरोजगार तरुणांऐवजी चक्क कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे जमा, महायुती सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठा घोटाळा
महाराष्ट्र आता थांबणार नाही! 9 महिन्यांत परकीय गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढले, 1 लाख 34 हजार कोटींचा खजिना राज्यात
महाराष्ट्र आता थांबणार नाही! 9 महिन्यांत परकीय गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढले, 1 लाख 34 हजार कोटींचा खजिना राज्यात
Ambadas Danve : अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! छत्रपती शिवराय अन् संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा तो फोटो शेअर करत अंबादास दानवेंचा हल्लाबोल
अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! छत्रपती शिवराय अन् संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा तो फोटो शेअर करत अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Bhavan Mahayuti Protest | अनिल परब याच्यांविरोधात महायुतीच्या नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलनABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 07 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स NewSantosh Deshmukh postmortem | संपूर्ण शरीर काळंनिळ, अंगावर जखमा, देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल समोरAdhiveshan Update | अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काय काय घडलं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
स्वारगेटमधील घटना ताजी असतानाच पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा अश्लील चाळे करत विनयभंग
बेरोजगार तरुणांऐवजी चक्क कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे जमा, महायुती सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठा घोटाळा
बेरोजगार तरुणांऐवजी चक्क कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे जमा, महायुती सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठा घोटाळा
महाराष्ट्र आता थांबणार नाही! 9 महिन्यांत परकीय गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढले, 1 लाख 34 हजार कोटींचा खजिना राज्यात
महाराष्ट्र आता थांबणार नाही! 9 महिन्यांत परकीय गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढले, 1 लाख 34 हजार कोटींचा खजिना राज्यात
Ambadas Danve : अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! छत्रपती शिवराय अन् संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा तो फोटो शेअर करत अंबादास दानवेंचा हल्लाबोल
अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! छत्रपती शिवराय अन् संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा तो फोटो शेअर करत अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Supreme Court : लग्नाचे वचन मोडणे म्हणजे बलात्कार नव्हे, आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही; सुप्रीम कोर्ट म्हणाले, '16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर असे आरोप करणे म्हणजे..'
लग्नाचे वचन मोडणे म्हणजे बलात्कार नव्हे, आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही; सुप्रीम कोर्ट म्हणाले, '16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर असे आरोप करणे म्हणजे..'
Santosh Deshmukh post mortem report: संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टेम रिपोट, अंगभर जखमा अन् काळनिळं पडलेलं शरीर
संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टेम रिपोट, अंगभर जखमा अन् काळनिळं पडलेलं शरीर
नांदेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट, मेहुणे अशोक चव्हाण भाजपात तर दाजी भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर
नांदेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट, मेहुणे अशोक चव्हाण भाजपात तर दाजी भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर
Swargate Bus Crime Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तरुणी पोलिसांवर संतापली, पोलिसांना जाब विचारत म्हणाली...
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तरुणी पोलिसांवर संतापली, पोलिसांना जाब विचारत म्हणाली...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.