को-अॅक्टरला करतीये डेट, नवऱ्याने थेट रंगेहाथ पकडलं? 4 महिन्यांच्या संसारानंतर अभिनेत्री अदिती शर्मा घटस्फोट घेणार?
Aditi Sharma And Abhineet Kaushik Divorce : अदिती शर्मा आणि अभिनित कौशिक हे विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचंही म्हटलं जातंय.

Aditi Sharma And Abhineet Kaushik : सिनेक्षेत्रात काम करणारे असे अनेक कलाकार आहेत, जे प्रेमविवाह करून सुखाने संसार करतायत. मात्र काही जोड्या अशादेखील आहेत, ज्यांचा संसार फार काळ चालू शकला नाही. सध्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदिती शर्मा आणि अभिनेता अभिनीत कौशिक यांचाही संसार लवकरच मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अदिती शर्माने अभिनीतपासून वेगळं राहण्याच निर्णय घेतला आहे.
करिअरला ब्रेक लागू नये म्हणून लग्न लपवलं
सूत्रांच्या माहितीनुसार अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांनी गुपचूप लग्न केले होते. या दोघांच्या कुटुंबीयांशिवाय हे लग्न इतर कोणालाही माहिती नाही. विशेष म्हणजे त्यांनी या लग्नाची बातमी कुठेही सार्वजनिक केलेली नाही. अदिती शर्मा ही अभिनीतला माझा मॅनेजर असल्याचे सांगते. लग्नामुळे करिअरला ब्रेक लागू नये, म्हणून तिने असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं, आता मात्र अदिती अभिनीतपासून विभक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
सर्वांना सांगते तो माझा मॅनेजर
मिळालेल्या माहितीनुसार अदितीने 12 नोव्हेंबर 2024 रोजी गोरेगाव येथील आपल्या घरात अभिनीत कौशिकसोबत लग्न केले होते. याच घरात ते बऱ्याच काळापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायचे. अदिती ही अभिनीतला तो माझा मॅनेजर असल्याचे सांगते. अदिती कलर्स टीव्हीच्या 'अपोलिना' या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. लग्नाची बातमी सार्वजनिक झाली तर काम मिळणे बंद होईल, या भीतीपोटी अदितीने लग्न केल्याचं सार्वजनिकरित्या जाहीर केलेलं नाही. दोघांनीही त्यांचे लग्न अद्याप गुप्तच ठेवले होते. मात्र आता लग्नाच्या चार महिन्यांनी अदितीने अभिनीतपासून विभक्त होण्याचे ठरवल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
अभिनीतने केले आहेत गंभीर आरोप
अदिती शर्माने माझी फसवणूक केल्याचा दावा तिचा कथित पती अभिनीत कौशिक याने केला आहे. लग्न झालेलं असूनही अदिती त्याचा को-स्टार असलेल्या सामर्थ्यला डेट करत आहे, असा आरोप अभिनीतने केलाय. तसेच या दोघांनाही अभिनीतने रंगेहाथ पकडल्यामुळे त्याचे अदितीसोबतचे संबंध जास्तच खराब झाले. अभिनीत आणि त्याचा वकील राकेश शेट्टी यांनी याबाबत अदितीच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्यातले लग्न हे खरे नव्हते. ते वैध लग्न नाही, असा दावा अदितीने केलाय.
25 लाख रुपयांची केली मागणी?
दरम्यान, अदितीने माझ्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली आहे, असा आरोप अभिनीतने केलाय. या दोघांमधील वाद आता वाढत चालला आहे. दोघांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :























