Manish Pandey-Ashrita Shetty : जे हार्दिक, युझवेंद्रच्या वाट्याला आलं, तेच आणखी एका बड्या क्रिकेटरच्या नशीबी; लवकरच संसार मोडण्याची शक्यता; दोघांनीही एकमेकांना...
अलिकडेच भारतीय अनेक क्रिकेटपटूंच्या आयुष्यात मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला.

Manish Pandey-Ashrita Shetty : अलिकडेच भारतीय अनेक क्रिकेटपटूंच्या आयुष्यात मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला. त्याचवेळी, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा वेगळे होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आधीच त्याची पत्नी हसीन जहाँपासून वेगळे झाला आहे. आता बातमी अशी आहे की, मनीष पांडे आणि त्यांची पत्नी आश्रिता शेट्टी या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी डिसेंबर 2019 मध्ये लग्न केले. बातमीनुसार, दोघांनीही सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
इंडिया डॉट कॉमच्या अलिकडच्या अहवालात हे म्हटले आहे. मनीष पांडे आणि त्यांची पत्नी आश्रिता त्यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्यांचही म्हटलं जातंय. दोघांनीही खूप धूमधडाक्यात लग्न केले पण आता ते एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. मनीष हा एक चांगला भारतीय क्रिकेटपटू आहे आणि कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक फ्रँचायझी संघांसाठी खेळला आहे. मनीषने 2018 मध्ये आशिया कप देखील खेळला होता.
आता बातमी अशी आहे की, मनीष आणि आश्रिता सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत नाहीत. त्याने सार्वजनिक ठिकाणी दिसणे बंद केले आहे. याआधी असे वृत्त आले होते की, दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. ताज्या अहवालानुसार, मनीष आता कोणालाही फॉलो करत नाही.
View this post on Instagram
मनीष पांडेची पत्नी आश्रिता शेट्टी कोण?
आश्रिता शेट्टी ही एक अभिनेत्री आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलकडे पाहिल्यावर समजते की, तिला डोंगर-दऱ्यांत फिरायला आवडते, ती तिच्या मित्रांसोबत जास्त डोंगर-दऱ्यांत फिरायला जाते. आश्रिता तिच्या आयुष्यात आनंद घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही आणि दुःखद कॅप्शन लिहित आहे. असे वृत्त आहे की मनीष आणि आश्रिताने त्यांच्या लग्नाचे फोटो देखील डिलीट केले आहेत; पण, दोघांनीही घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. मनीषने गेल्या 40 आठवड्यांपासून त्याच्या इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट केलेले नाही.
View this post on Instagram
आश्रिताने बहुतेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे सुमारे 2,18,000 फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे, मनीष गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्याने भारतासाठी 29 एकदिवसीय आणि 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनीषशी लग्न केल्यानंतर आश्रिताने चित्रपटांना अलविदा म्हटले होते, असे वृत्त आहे. या जोडप्याचे लग्न 2 डिसेंबर 2019 रोजी झाले. लग्नापूर्वी ते काही काळ डेट करत होते.




















