IPL 2023 : MI च्या अडचणीत वाढ! जोफ्रा आर्चर आयपीएलमधून 'आऊट', इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात
Chris Jordan Replaces Jofra Archer : जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंडचा वेगवान-मध्यम गोलंदाज ख्रिस जॉर्डन याला मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात सामील झाला आहे.
Jofra Archer ruled out of IPL, Chris Jordan Join MI Squad : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर गेला आहे. यामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्चरच्या जागी मुंबईच्या संघात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सामील झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंडचा वेगवान-मध्यम गोलंदाज ख्रिस जॉर्डन याला मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे. तो आयपीएल 2023 चा संपूर्ण हंगाम मुंबईच्या पलटनमध्ये असणार आहे.
मुंबईच्या अडचणीत वाढ! जोफ्रा आर्चर आयपीएलमधून 'आऊट'
मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्सने ट्वीट करत म्हटलं आहे, ''ख्रिस जॉर्डन मुंबईच्या संघात सामील. ख्रिस जॉर्डन उर्वरित हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होईल. ख्रिसने जोफ्रा आर्चरची जागा घेतली आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतग्रस्त असून त्यांच्या रिकव्हरी आणि फिटनेसचं निरीक्षण केलं जात आहे. जोफ्रा उपचारांसाठी मायदेशी परतणार आहे.''
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात
𝗖𝗵𝗿𝗶𝘀 𝗝𝗼𝗿𝗱𝗮𝗻 𝗷𝗼𝗶𝗻𝘀 𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀
— Mumbai Indians (@mipaltan) May 9, 2023
Chris Jordan will join the MI squad for the rest of the season.
Chris replaces Jofra Archer, whose recovery and fitness continues to be monitored by ECB. Jofra will return home to focus on his rehabilitation.… pic.twitter.com/wMPBdmhDRf
दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर उर्वरित हंगामातून बाहेर
मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलच्या सुरुवातीपासूनच अडचणीत होता. तो संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फिटनेसच्या समस्यांमुळे त्रस्त होता. यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सच्या दहापैकी पाच सामन्यांनाही तो मुकला होता. आर्चरच्या जागी आणखी एक इंग्लंडचा स्टार गोलंदाड ख्रिस जॉर्डनची निवड करण्यात आली आहे. जॉर्डन मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे.
Mumbai Indians Squad : मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयुष चावला, आकाश मधवाल, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, देवाल्ड ब्रेविस, राघव गोयल , विष्णू विनोद, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, टिळक वर्मा, हृतिक शोकीन, डुआन जॅनसेन, संदीप वॉरियर, जेसन बेहरेनडॉर्फ.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : मुंबईविरोधात सामन्याआधी कोहलीला सचिन तेंडुलकरकडून धडे, दोघांची भेट चर्चेत