एक्स्प्लोर

IPL 2023 : मुंबईविरोधात सामन्याआधी कोहलीला सचिन तेंडुलकरकडून धडे, दोघांची भेट चर्चेत

Virat Kohli and Sachin Tendulkar : मुंबई विरुद्ध बंगळुरु जंगी सामन्याआधी कोहलीची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट झाली आहे. ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

MI vs RCB, IPL 203 Match 54 : मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) आज दोन दिग्गज क्रिकेटपटू आमने-सामने येणार आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जातात. दोघांचंही भारतासह परदेशाताही मोठा चाहतावर्ग आहेत. आजच्या जंगी सामन्या आधी विराट कोहलीची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट झाली आहे.

मुंबईविरोधात सामन्याआधी कोहलीला सचिन तेंडुलकरकडून धडे

मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्या आधी कोहली आणि तेंडुलकरची भेट झाली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघे हात मिळवताना, हसताना आणि बोलताला दिसत आहेत. मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघ सामन्या आधी सराव करताना दिसत आहेत. यावेळी या दोघांची भेट झाली. दोन दिग्गज क्रिकेटपटूंना एकत्र पाहून चाहते खूश झाले आहेत.

विराट आणि सचिनची भेट चर्चेत

मुंबई विरुद्ध बंगळुरु लढत

आज आयपीएल 2023 मधील 54 व्या सामन्यात (IPL 2023) मुंबई आणि बंगळुरु (MI vs RCB) या संघांमध्ये लढत होणार आहे. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) आमने-सामने येणार आहेत.  मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा जंगी सामना रंगणार आहे. अत्यंत चुरशीच्या अशा या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये कोणत्या संघाला यश मिळणार हे पाहावं लागेल.

प्लेऑफमध्ये कुणाला संधी?

दोन्ही संघांनी त्यांच्या दहा सामन्यांपैकी प्रत्येकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या गुणतालिकेत बंगळुरु पाचव्या आणि मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला टॉप 4 मध्ये म्हणजेच प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा पहिला पराभव झाला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिल्ली कॅपिट्ल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs RCB Playing 11 : वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध बंगळुरु जंगी सामना, कोहली विरोधात रोहितची 'पलटन' मैदानात, पाहा प्लेईंग 11 कशी असेल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget