शार्दूल ठाकूर संघाबाहेर, कोलकात्यामध्ये चार बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
DC vs KKR Playing XI : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
DC vs KKR Playing XI: दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना जवळपास तासभर उशीराने सुरु होत आहे. पावसामुळे मैदान संथ झाले असेल.. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना धावा जमवणे कठीण जाम्याची शक्यता आहे. कोलकाता संघाने आपल्या संघात चार बदल केले आहेत. तर दिल्लीच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत.
दिल्लीने इशांत शर्मा आणि फिल साल्ट यांना संधी दिली आहे. तर कोलकात्याने लिटन दास आणि जेसन रॉय यांना स्थान दिलेय.. कोलकात्याने आज लॉर्ड शार्दुल ठाकूर याला प्लेईंग 11 च्या बाहेर ठेवलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11
दिल्ली कॅपिटल्स- डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हाकिम खान, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.
कोलकाता नाइट रायडर्स- जेसन रॉय, लिटन दास (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), मनदीप सिंह, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals win the toss and elect to field first against @KKRiders.
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
Follow the match ▶️ https://t.co/CYENNIiaQp #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/WopA9ZSaJO
Take a look the Playing XIs of the two sides 👌👌
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
Follow the match ▶️ https://t.co/CYENNIiaQp
#TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/Q6SsrijI1D
KKR vs DC Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता संघाने 30 सामन्यांपैकी 16 सामने जिंकले आहेत, दिल्लीला 14 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Arun Jaitley Stadium, Delhi Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium, Delhi) मैदानावर अनेक मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.