Women T20 Challenge: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघ जाहीर; मिताली राज, झुलन गोस्वामीला विश्रांती
भारतीय नियामक मंडळानं नुकतीच महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर सुपरनोव्हास आणि स्मृति मानधना ट्रेलब्लेझर्सच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.
Women T20 Challenge: भारतीय नियामक मंडळानं (BCCI) नुकतीच महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हास (Supernovas) आणि स्मृति मानधना (Smriti Mandhana) ट्रेलब्लेझर्सच्या (Trailblazers) संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, दीप्ती शर्माकडं (Deepti Sharma) व्हेलोसिटी संघाची (Velocity) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला निवड समितीनं या 3 संघांसाठी खेळाडूंची निवड केली. प्रत्येक संघासाठी 16 खेळाडू निवडले गेले आहेत. आयपीएल 2022 च्या शेवटच्या टप्प्यात महिला टी-20 चॅलेंजचं आयोजन केलं जाणार आहे. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धतील यंदाच्या हंगामाचं 23 मे ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे आयोजन केलं जाईल.
महिला टी-20 चॅलेंजमध्ये 12 परदेशी खेळाडूंचा समावेश
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत एकून चार सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा संघातील एकूण 12 परदेशी खेळाडू महिला टी-20 चॅलेंजचा भाग असतील, असं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं होतं. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स एकमेकांच्या आमने-सामने येतील.
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचं वेळापत्रक
महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील 3 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. तर, 24 मे रोजी सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. तिसरा सामना 26 मे रोजी व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. महत्वाचं म्हणजे, बीसीसीआयनं भारतीय कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांना या स्पर्धेतून विश्रांती दिली आहे.
महिला T20 चॅलेंज 2022 साठी संघ खालीलप्रमाणे-
सुपरनोव्हासचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, अलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.
ट्रेलब्लेझर्सचा संघ:
स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन मल्लिका, शर्मीन अख्खा, शर्मीन अख्तर एस.बी.पोखरकर.
व्हेलोसिटीचा संघ:
दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड, माया सोनवणे, नत्थकन चांटम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्त बहादुरी, यस्तिका प्रणवी चंद्रा
हे देखील वाचा-
- Hardik Pandya : हार्दिक पांड्या धोनीसारखा कर्णधार, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया
- IPL : शेतकऱ्याची लेक गाजवणार मैदान'; पाथर्डीची आरती केदार आयपीएलमध्ये, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भरारी
- IPL 2022 Purple Cap : पर्पल कॅपसाठी 'या' खेळाडूंमध्ये जोरदार चुरस, युझवेंद्र चहल अव्वल स्थानावर