IPL 2022 Purple Cap : पर्पल कॅपसाठी 'या' खेळाडूंमध्ये जोरदार चुरस, युझवेंद्र चहल अव्वल स्थानावर
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर आपला कब्जा केला आहे.
IPL 2022 Purple Cap : आयपीएल 2022 चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम अंतिम टप्यात येत असताना पॉईंट टेबलमध्ये चुरस वाढल्याचे चित्र दिसत आहे. अशातच राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर आपला कब्जा केला आहे. काल झालेल्या लखनौविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडाला पॅव्हेलियनमध्ये पाठवताच तो पुन्हा आयपीएलच्या या मोसमातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा पर्पल कॅप आली आहे.
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने आतापर्यंत 13 सामन्यांत 23 बळी घेतले आहेत. या सामन्यापूर्वी पर्पल कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वानिंदू हसरंगाकडे होती. त्याने 13 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. तर चहलने 23 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे चहल आणि हसरंगा यांच्यात पर्पल कॅपसाठी जोरदार सुरस असल्याचे दिसत आहे. पर्पल कॅपच्या या शर्यतीत पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या दोन दिग्गज फिरकीपटूंना चांगलीच टक्कर देत आहे. त्याने केवळ 11 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमीही या शर्यतीत सामील झाला आहे. रविवारी चेन्नईविरुद्ध 2 विकेट घेत त्याने या मोसमातील त्याच्या एकूण बळींची संख्या 18 वर नेली आहे. त्यामुले चांगलीच सुरस असल्याचे पाहायलामिळत आहे.
पाहा कोणी किती घेतल्या विकेट
युझवेंद्र चहलने 13 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. त्याने 16.83 च्या बॉलिंग अॅव्हरेजने आणि 7.76 च्या इकनॉमी रेटने या 24 विकेट घेतल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वानिंदू हसरंगाने 14.65 बॉलिंग अॅव्हरेजने आणि 7.48 च्या इकनॉमी रेटने 23 विकेट घेतल्या आहेत. तसेच कागिसो रबाडाने 11 सामन्यात 21 विकेट, मोहम्मद शमीने 13 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. तर हर्षल पटेल पाचव्या स्थानावर असून त्याने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.
काल राजस्थाननं लखनौवर विजय मिळवला. या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत. त्यांनी 13 पैकी 10 सामने जिंकत गुजरातनं 20 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर राजस्थानचा संघ आठपैकी आठ सामने जिंकत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. लखनौनं देखील आठ सामने जिंकले आहेत ते 16 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स हा प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरला. 13 पैकी 10 सामने जिंकत गुजरातनं 20 गुणांसह प्ले ऑफमध्ये निर्विवादपणे प्रवेश केला आहे. राजस्थान आणि लखनौ सुपर जायंट्स प्रत्येकी 16 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत. त्यांचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे मात्र त्यांना पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना हरल्यास दोन्ही संघाला बंगळुरु आणि दिल्लीच्या पराभवाची वाट पाहावी लागणार किंवा नेट रनरेटचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात चुरस वाढण्याची शक्यता आहे.