(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA WC 2022: मोरोक्कोची पोर्तुगालवर मात, विजयानंतर आईसोबत खेळाडूचं खास सेलिब्रेशन; Video Viral
Morocco Sofiane Boufal: मोरोक्कोचा हा विजय ऐतिहासिक विजय आहे. मोरोक्को विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.
Morocco Sofiane Boufal: कतारमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. काल झालेल्या मोरोक्को (Morocco) विरुद्ध पोर्तुगालच्या (Portugal) सामन्यात मोरोक्कोनं दणदणीत विजय मिळवला. याच सामन्यात स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) नेतृत्त्वात खेळणाऱ्या पोर्तुगालच्या संघाला मात्र परभवाचा सामना करावा लागला. यासोबतच पोर्तुगालचा फुटबॉल संघ सेमीफायनल्सपूर्वीच स्पर्धेतून माघारी परतला आहे. मोरोक्कोनं पोर्तुगालवर मात कर ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आणि सेमिफायनल्सचं तिकीट मिळवलं. हा विजय म्हणजे, मोरोक्कोसाठई ऐतिहासिकच. संघातील प्रत्येक खेळाडूनं या सामन्यानंतर खास सेलिब्रेशन केलं.
मोरोक्कोकडून विंगर आणि अटॅकिंग मिडफिल्डरच्या रुपात खेळणारा सोफिएन बूफल (Sofiane Boufal) यानंही आपल्या आईसोबत विजयाचा आनंद साजरा केला. सोफिएनच्या या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Morocco's Sofiane Boufal celebrating with his mother is EVERYTHING.
— Ahmed Ali (@MrAhmednurAli) December 10, 2022
pic.twitter.com/h3XdhTeKe3
सामना संपल्यानंतर बौफल आणि त्याची आई मैदानावर एकत्र नाचताना दिसून आले. या विजयामुळे दोघंही खूप होते आणि त्यांनी त्यांचा आनंद जल्लोषात साजरा केला. बूफल आणि त्याची आई एकत्र नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही तासांतच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
यंदाच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहचणारा मोरक्को तिसरा संघ ठरलाय. याआधी अर्जेंटिना क्रोएशिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाने पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले. तर मेस्सीच्या अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला होता. उपांत्य पूर्वी फेरीतील अखेरचा सामना इंग्लंड-फ्रान्स यांच्यात होणार आहे. विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे.
फीफा वर्ल्ड कप सेमीफाइनल शेड्यूल
13 डिसेंबर : क्रोएशिया Vs अर्जेंटीना (रात्री उशिरा 12.30 वाजता)
14 डिसेंबर : मोरक्को Vs फ्रान्स (रात्री उशिरा 12.30 वाजता)
मोरक्कोनं रचला इतिहास
मोरोक्कोनं पोर्तुगालला पराभूत करून इतिहास रचला. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही, मात्र उत्तरार्धात मोरोक्कोनं गोल करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. मोरोक्कोनं संपूर्ण स्पर्धेत डिफेंसचं उत्तम प्रदर्शन केलं. या पराभवामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. आता उपांत्य फेरीत मोरोक्कोचा सामना फ्रान्सशी होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Portugal Vs Morocco: रोनाल्डो आणि पोर्तुगालचं आव्हानं संपलं, मोरक्कोची पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक