अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
जोगेश्वरी पश्चिमेत ओशिवरा परिसरात पती-पत्नीचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करत एजाज खानने पोलिसांच्यासमोरच जोडप्यामधील पतीला गाडीमध्ये बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड किंवा सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी आणि वाद हे काही नवं नाही. त्यातील अनेक स्टार चेहरे वादाग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे नेहमीच चर्चेत असता. त्यापैकी, एक म्हणजे बिग बॉस हिंदीमधील कंटेस्टंट राहिलेला अभिनेता एजाज खान. यापूर्वी एजाज खान व त्याची पत्नी ड्रग्जप्रकरणात अटक झाल्याने चर्चेत आले होते. मात्र, 31 डिसेंबर दिवशी एजाज खानने (Ajaz khan) मारहाण केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे एजाज खानकडून पोलिसांसमोरच एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर अभिनेत्याविरूद्धही पोलिस (Police) कारवाईला सुरुवात झाली आहे. एजाजने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटीझन्सकडूनही एजाजवर कारवाई करण्याची मागणी केली जातआहे.
जोगेश्वरी पश्चिमेत ओशिवरा परिसरात पती-पत्नीचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करत एजाज खानने पोलिसांच्यासमोरच जोडप्यामधील पतीला गाडीमध्ये बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पती दारू प्यायल्यामुळे त्याच्या पत्नीकडून पतीच्या विरोधात तक्रार करण्यात येत होती. त्यासाठी संतप्त पत्नी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये जात असताना तिथून जात असलेल्या एजाज खान यांनी पतीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओशिवरा पोलिसांकडून एजाज खानविरोधातही कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेच, एजाज खान यांनी काल दिवसभरात मारहाणीच्या दोन घटना केल्याचंही समोर आलं आहे. दुसरी घटना एजाज खान जिम करत असताना शेजारी जिम करणाऱ्या दुसरा व्यक्तीने जिमचे सामान उचलल्यामुळे रागाच्या भरात जिममध्ये एजाज खानने त्यास मारहाण केल्याची माहिती आहे. जिममधील मारहाणीच्या घटनेप्रकरणी एजाज खानविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज खानकडून दोन्ही मारहाणीच्या घटनेप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे वादग्रस्त अभिनेता एजाज खान यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. तर, पोलीस कारवाईला एजाज खान कसे सामोरे जातात हेही पाहावे लागेल. दरम्यान, एजाज खानने टेलिव्हीजनमधील अनेक मालिकांमध्ये काम केलं असून काही बॉलिवूड चित्रपटातही महत्वाची भूमिका बजावली आहे. रक्तचरित्र, बादशाह हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.
हेही वाचा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ