Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?
Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?
अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंनी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. आणि अर्थातच त्या विठुरायाला एक साकडंही घातलं. जवळपास १८ महिन्यांपूर्वी वेगळे झालेल्या शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं आणि कुटुंबातील कटूता संपावी, असं साकडं त्यांनी घातलं. त्यामुळं अजित पवारांच्या मातोश्रींना आपल्या मुलाच्या मनात नेमकं काय सुरु आहे, हे समजल्याची चर्चा रंगलीय. पाहूया, एक रिपोर्ट.आपली ही 'छोटीसी आशा' विठ्ठलाच्या कानावर घालताना आशाताईंनी नोटांचे दोन गठ्ठे मनोभावे विठुचरणी अर्पण केले. दानपेटीच्या फटीपेक्षाही जाडजुड असणारे हे गठ्ठे आशाताईंनी अगदी भक्तीभावानं पेटीत सारले... दोन्ही पवारांनी एकमेकांविषयी मनात असणाऱ्या अशाच छोट्या-छोट्या फटी दूर कराव्यात..
आणि थोडा ताण पडला तरी या नोटांप्रमाणंच एकमेकांना स्वतःच्या हृदयात सामावून घ्यावं, अशीच प्रार्थना त्यांनी केली असावी.. एक मागणं अजित पवारांच्या मनात फट राहू नये, यासाठी..
आणि दुसरं जणू शरद पवारांनी आपलं मन मोठं करावं.. यासाठी..आशाताईंची ही छोटीसी आशा आहे, असं वाटत असलं, तरी ती पूर्ण करण्यासाठी दोन्ही पवारांना आपलं मन मोठं करावं लागणार आहे. मोठं मन तयार करण्यासाठी गेल्या दीड वर्षात पडलेल्या अनेक 'राजकीय फटी' बुजवाव्या लागणार आहेतशरद पवार हेच आपले 'राजकीय विठ्ठल' असल्याचं अजित पवारांनी अनेकदा म्हटलंय.संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे या विठ्ठलाविषयी अजितदादांच्या मनात 'प्रेमभावो' निर्माण होणार, की या 'विठ्ठल नामाचा टाहो' फोडणं दादा सुरुच ठेवणार, हे मात्र पंढरीच्या विठ्ठलालाच ठाऊक..