एक्स्प्लोर
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
Parabhani News : परभणीतील जिलेबी विक्रेती सनी सिंग यानं जिलेबी वाटप करुन 1 जानेवारी रोजी जन्मलेल्या मुलींचं स्वागत केलं. यावेळी विठ्ठल कांगणे उपस्थित आहेत.
परभणीत मुलींच्या जन्माचं स्वागत
1/6

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या मुलींचा जन्म झाला त्यांच्या जन्माचं स्वागत परभणीतील जिलेबी विक्रेत्याकडून करण्यात आलं. मुलींच्या जन्मानिमित्त जिलेबी मोफत देण्यात आली तसेच एका मातेला सोन्याचे नाणे तर दोन मातांना चांदीचे नाणे देण्यात आलं.
2/6

गेल्या 14 वर्षांपासून परभणीतील जिलेबी विक्रेत्या तरुणानं हा अनोखा उपक्रम सुरु ठेवला आहे.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी परभणीत जन्मलेल्या मुलींना लकी ड्रा पद्धतीने सोन्याचं चांदीच्या नाण्यासह दोन किलो जिलेबी फ्री देण्याचा उपक्रम एका जिलेबी विक्रेत्याकडून राबवला जातोय.
3/6

परभणी शहरातील हरियाणा जिलेबी या छोट्याशा जिलेबी विक्री व्यवसायाचा संचालक असलेला सनी सिंग हा उपक्रम चालवतात.
4/6

मागच्या 14 वर्षांपासून 1 जानेवारी रोजी जन्मलेल्या मुलींच्या कुटुंबियांना 2 किलो जिलेबी मोफत दिली जाते.
5/6

परभणी जिल्हा रुग्णालयात आज जन्मलेल्या मुलींमध्ये लकी ड्रॉ पद्धतीनं तीन नावं काढून एका मुलीच्या कुटुंबाला एक ग्राम सोन्याचा नाणं तसेच दोन मुलीच्या कुटुंबाला एक एक ग्राम असे दोन नाणे चांदीचे भेट म्हणून देण्यात आली.
6/6

आज जिल्हा रुग्णालयात एकुण 7 मुली जन्मल्या त्यातील संजीवनी शिवाजी साखरे यांच्या मुलीचा लकी ड्रा मध्ये पहिला नंबर आल्याने त्यांना सोन्याचं नान तसेच मीरा अवकळे आणि शारदा परडे यांच्या मुलींना एक एक ग्राम चांदीचे नाणे देण्यात आले. सर्व 7 मुलींच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 किलो जिलेबी भेट देण्यात आली आहे.बेटी नही तो बहू कहा से लाओगे म्हणत सनी सिंग या स्त्री जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने करतात. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. या उपक्रमाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे उपस्थित होते.
Published at : 01 Jan 2025 11:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















