Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष ... यांच्यातील नक्की नातं काय? संघ ही मातृसंस्था तर भाजपा त्याची शाखा. संघ एक व्यापक विचारधारा तर भाजपा ती विचारधारा पुढे नेण्यासाठीची राजकीय व्यवस्था. आणि त्यामुळेच संघाचे स्वयंसेवक असलेले, अगदी प्रचारक राहिलेले नरेंद्र मोदी हे भाजप सरकार आल्यावर पंतप्रधान झाले ह्यात कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. आज मात्र तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असताना पुन्हा एकदा संघ आणि भाजपचं नातं चर्चेत आलंय.. म्हणायला सुरुवात झाली ती सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका वक्तव्यामुळे..
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.. त्याच व्याख्यानमालेत मोहन भागवतांचं मार्गदर्शन झालं.. त्यांच्या त्याच भाषणात भारतला विश्वगुरु होण्यासाठी काय काय पाऊलं उचलली गेली पाहिजेत.. असं बोलत असतानाच... रामजन्मभूमी हा श्रद्धेचा विषय होता.. आता रोज नव्याने असे विवाद नको, अशी भूमिका मोहन भागवतांनी मांडली.. काही काळ आधी भागवतांनी प्रत्येक मशिदीत मंदिर शोधू नका अशी जी भूमिका मांडली होती त्याला धरूनच हे वक्तव्य ... भागवतांनी हे म्हटले आणि अनेक महतांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अगदी भागवतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काही महंतांनी अतिशय तिखट भाषेत टीका केलीये. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी तर मोहन भागवतांना हिंदूविरोधी ठरवलंय. तर मोहन भागवत आमचे शासक नाहीत, एकवेळ आम्ही त्यांचे शासक होऊ शकते असं म्हणत स्वामी रामभद्राचार्य यांनी देखील नाराजी व्यक्त केलीये. साध्वी ऋतंबरा यांनी देखील भागवतांच्या वक्तव्याशी असहमती व्यक्त केलीये...