एक्स्प्लोर

IND vs NZ Live Streaming : भारत-न्यूझीलंडमध्ये आज रंगणार मालिकेतील अखेरचा टी20 सामना, कधी, कुठं पाहाल मॅच?

IND vs NZ : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अखेरचा टी20 सामना खेळवला जाणार आहे.

India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या टी20 मालिकेत कर्णधार बनून मैदानात उतरणार आहे.तसंच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून भविष्यातील टी20 सामन्यांच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात बदलाची शक्यता असून या मालिकेतून खेळाडूंचा खेळ तपासण्याची संधी बीसीसीआयकडे आहे. दरम्यान आज होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...

कधी होणार सामना?

भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसरा टी20 सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

भारताची मालिकेत आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. वेलिंग्टनमध्ये होणारा सामना रद्द झाल्यानंतर आज दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता मंगळवारी तिसरा सामना खेळवला जाणार असून भारताने तो जिंकल्यास मालिकाही भारत जिंकल, तसंच न्यूझीलंडने सामना जिंकल्या मालिका अनिर्णीत सुटणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam Speech Kurla:शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा बदला घ्यायचा,उज्ज्वल निकमांचा हल्लाबोलMumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Embed widget