Virat Kohli : खावो-पिओ ऐश करो मित्रो, विराटचा चाहत्यांना सल्ला, शेअर केला बालपणीचा Cute फोटो
Virat Kohli Instagram : युएईमध्येसुरू आशिया चषक स्पर्धतून (Asia Cup 2022) भारतीय संघ बाहेर झाला असला तरी भारताच्या स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीनं शतक झळकावल्यानं सर्व भारतीय चाहते सुखावले आहेत.
Virat Kohli Instagram Story : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) गुरुवारी (8 सप्टेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद 122 धावा ठोकत पहिलं-वहिलं टी20 आंतरराष्ट्रीय शतक (T20 International Century) झळकावलं. तसंच जवळपास तीन वर्षांपासून एकही शतक न झळकावलेल्या विराटनं शतकांचा दुष्काळही संपवला. त्यानंतर आता विराटचे चाहते कमालीचे आनंदी असून विराटही टेन्शन फ्री झाल्याचं दिसत आहे.
विराटने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी (Virat Kohli Instagram Story) शेअर केली आहे, ज्यात स्वत:चा बालपणीचा फोटो त्याने टाकत एक मजेशीर मेसेज लिहिला आहे. विराटनं या फोटोवर पंजाबीमध्ये लिहिलं आहे की, 'खावो पिओ ऐश करो मित्रो, दिल पर किसीदा दुखायो ना.' याचा मराठीत अर्थ म्हटलं तर 'खाऊन-पिऊन मजा करा मित्रांनो, पण कुणाचं मन दुखवू नका.'
पाहा Virat Kohli ची इन्स्टाग्राम स्टोरी-
विराटचं 1021 दिवसानंतर शतक
विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होतं. त्यानंतर जवळपास तीन वर्षांपासून त्याला एकही शतक झळकावता आलं नव्हतं. कोणत्याच फॉर्मेटमध्ये त्याला शतक मारता आलं नव्हतं. परंतु, गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यात आलेल्या विराटनं शतक झळकावलं. विराटनं तब्बल 1021 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे.
एक शतक अन् अनेक विक्रमांना गवसणी
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिल्या शतकानंतर विराट कोहलीनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. आतंरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली सहावा भारतीय फलंदाज ठरलाय. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक झळकावली आहेत. रोहित शर्मानं टी 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक चार शतकं झळकावली आहेत. त्यानंतर राहुलच्या नावावर दोन शतकं आहेत. विराटनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटममधील 3 हजार 584 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मार्टिन गप्टिलला मागं टाकलंय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3500 हून अधिक धावा करणारा विराट दुसरा फलंदाज ठरलाय.
हे देखील वाचा-