एक्स्प्लोर

IPL 2025 Ashwani Kumar: अश्वनी कुमार MI चा नवा भारतीय

IPL 2025 Ashwani Kumar: काल मुंबई विरुद्ध  कलकत्ता या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई संघाला एक नवीन मॅच विनर सापडला..नाव आहे अश्वनी कुमार.स्वप्नवत पदार्पण.कुठल्याही भारतीय खेळाडूने केलेले आई पी एल मधील गोलंदाज म्हणून सर्वोत्कृष्ट पदार्पण...यासाठी मुंबई संघाच्या स्काऊट टीम चे सुद्धा खूप अभिनंदन करायला हवे. शेर ए पंजाब ही स्पर्धा खेळत असताना त्यांना हा सापडला..आणि आज या तरुणाने  क्रिकेट च्या पंढरीत इतिहास घडविला. नाणेफेक जिंकून हार्दिक ने अपेक्षेप्रमाणे  गोलंदाजीचा निर्णय घेतला..संध्याकाळी उत्तम स्विंग करणारे गोलंदाज मुंबई  मध्ये अडचणीत आणू शकतात हा  इतिहास आहे..आणि आज तो पुन्हा खरा ठरला.एका स्विंगिंग यॉर्कर वर सुनील नारायण त्रिफळाचित झाला... डी कॉक आणि अय्यर चा अडथळा चहर ने दूर केला...आणि मग एका स्वप्नवत पदार्पणाची सुरुवात झाली.

पहिल्यांदा उजव्या यष्टि  बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला स्क्वेअर ड्राईव्ह करताना डीप पॉईंट ला पकडले..रिंकू सिंग ला इन साईड आउट खेळताना फसविले..मनीष पांडे आणि आंद्रे रसेल धोकादायक वाटत असताना स्क्रॅम्बल सीम चेंडू वापरून त्रिफळाचित केले...एका मागून एक बळी जात असताना कलकत्ता संघाकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न देखील झाला नाही याचे विशेष वाटते..ज्या संघाकडे चंद्रकांत पंडित प्रशिक्षक आहेत ते अशा गोष्टी सहन करीत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे. ..त्यामुळे सामना संपल्यावर त्यांची शाळा होईल हे नक्की.

अश्विनी कुमार याने आज आपल्या सर्वांच्या आशा उंचाविल्या आहेत..त्याचकडे सुंदर ऍक्शन आहे...चांगला बाउन्स आहे... स्विंग आहे....आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याच्याकडे शिस्त आहे..आपल्याकडे नेहरा... आर. पी.. झहीर ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीची काही नावाजलेली विद्यापीठे आहेत. ..या खेळाडूने त्यांचे मार्गदर्शन घेऊन आणि मेहनत करून आपला प्रवास चालू करावा...कारण आज सुद्धा भारतीय संघात झहीर नंतर कोण हाच प्रश्न आहे....मागे खालील अहमद ने थोड्या आशा दाखविल्या होत्या पण त्या आशाच राहिल्या.

११६ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात रोहित गेल्यावर देखील उत्तम झाली...डावातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा शार्प इन स्विंग होऊन रोहितच्या यष्टांवरून गेला...पण रोहित ला या गोष्टीचा फायदा उठविता आला नाही..मात्र तो बाद झाल्यावर रिकलटण या फलंदाजाला मुंबई व्यवस्थापन का इतके हाय रेट करते हे त्याने दाखविले ..४१ चेंडूत ६२ धावा काढून स्पर्धेतील पाहिले अर्धशतक झळकविले... सूर्यकुमार यादव ने ९ चेंडूत २७ धावांची छोटी पण नयनरम्य खेळी...त्यात त्याने रसेल ला मारलेला  पाचव्या ते सहाव्या   स्टंप वरचा चेंडू डीप फाइन लेगवरून उभ्या  उभ्या प्रेक्षकात भिरकावला...हा फटका पाहून स्वर्गात डब्ल्यू जी ग्रेस डोक्यावर हात मारीत असतील....कलकत्त्याच्या डावात फक्त एकच चांगली गोष्ट घडली अजिंक्य रहाणेने शॉर्ट कव्हर वर  यंग चा घेतलेला सुंदर झेल..आजचा सामना जिंकून मुंबई ने विजयाची गुढी उभारली आहे..फक्त चाहते वाट पाहतात ते मुंबई चा राजा फॉर्ममध्ये येण्याची...

ही बातमीही वाचा:

Ajinkya Rahane : गतविजेते KKR तळाशी... मुंबईविरुद्ध लाजिरवाण्या परावानंतर संतापला कर्णधार अजिंक्य रहाणे, कोणावर फोडले पराभवाचे खापर?

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget