एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?

Raj Thackeray : महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज ठाकरेंनी हटके प्लॅन आणलाय.

Raj Thackeray : मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले पालिका सभागृह भरलेले नाही. महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'प्रति महापालिका' सुरु करण्याचा निर्धार राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.

याबाबत मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, काही ठिकाणी तीन वर्ष, काही ठिकाणी पाच वर्ष होत आलेत, महापालिका अस्तित्वात नाही. महापालिका दोन चाकांवर चालते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. यातलं एक चाक पूर्णपणे पंक्चर झाले आहे, त्या एका चाकाची वाट लागली आहे. एका चाकावर गाडी चालू आहे, त्यामुळे ती गाडी पलटते. आता गाडी रुळावर आणण्यासाठी ही संकल्पना सुरू करत आहोत. मुंबईतल्या लोकांना समस्यांवर आम्हाला बोलायचं आहे. फेक प्रॉब्लेमवर बोलायला अनेक जण आहेत. कबरी, कामरा असे अनेक मुद्दे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

कसं असणार प्रति महापालिका सभागृह?

  • प्रति महापालिका सभागृहात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला आम्ही पत्र देऊन त्यांचे दहा ते पंधरा जण त्या समस्या सोडवण्यासाठी येतील. लोकांचे प्रश्न ते मांडतील. 
  • काही एनजीओला सुद्धा आम्ही बोलणार आहोत. समस्या सोडवल्या जाणार का? त्यापेक्षा समस्या मांडल्या जाव्यात, हा उद्देश आहे.  
  • ज्या नागरिकाला महापालिका प्रश्नांसंदर्भात जाण आहे, असा एखादा वरिष्ठ व्यक्ती प्रतिमहापौर म्हणून बसणार. तो कुठल्याही पक्षाचा नसेल.  
  • प्रतिमहापौर म्हणून कोणाला बसवायचे यासाठी पत्रकार आणि काही नागरिक यांची समिती नेमली जाईल. ते ठरवतील की त्या दिवशीचा प्रति महापौर कोण असेल. 
  • शहरातल्या एकाच ठिकाणी हे प्रति सभागृह नसेल. वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे प्रति सभागृह तयार करून चर्चा घडवून आणू.  
  • यामध्ये श्रेय वादाची काहीच गोष्ट नाही. नाहीतर आम्हीच आमचा महापौर आणि आमचे प्रतिनिधी बसवले असते.
  • एखाद्या पक्षाचा माणूस वैयक्तिकरित्या जरी आमच्या सोबत आला तरी आम्ही त्याला सोबत घेऊ.
  • मुंबईमध्ये सुरू करून हे सभागृह वेगवेगळ्या शहरात सुरू करू. 
  • आम्ही आयुक्त आणि नगर विकास विभागाला सुद्धा पत्र लिहून त्यांचे कोणी अधिकारी येऊ शकत असतील तर त्यासाठी बोलणार आहोत.

प्रति सभागृह राज्य सरकारच्या विरोधात असणार?

प्रति सभागृह राज्य सरकारच्या विरोधात असणार का? असे विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, कोणाच्या विरोधात हे सभागृह नाही, समस्यांवरच हे सभागृह असेल. एखादं वाक्य आम्ही बोललो तर हे कोणाच्या विरोधात आहे किंवा कोणाच्या सोबतच आहे, असं निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.  मला आरोप-प्रत्यारोप करायचं नाहीये? लोकांच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील

मनसेचा भाजपला पाठिंबा आहे की नाही? असे विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, पाठिंबा व्यक्तीला नाही भूमिकेला दिलेला असतो. कुठल्या पक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही, त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊ.  महापालिका निवडणूक एकत्र लढायच्या की नाही हा आत्ताचा विषय नाही. जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा बघू. राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले. 

...तर तुमच्यावरही वैयक्तिक टीका होईल

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली होती. याबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, आशिष शेलार यांच्यासोबत माझी वैयक्तिक दुश्मनी नाही. आशिष शेलार राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका करत होते. एखादी पॉलिसी किंवा विचार पटला नाही आणि टीका केली तर हे समजू शकतो. जर तुम्ही राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करणार तर तुमच्यावर ही वैयक्तिक टीका होऊ शकते. हा मेसेज आम्ही दिला आहे. आमच्याकडून हा विषय आता संपला आहे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

MNS : मराठी गया तेल लगाने, मनसैनिकांची ठाण्यातील बँकेत धडक, मुजोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला तेल लावून चोपलं!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget