एक्स्प्लोर

Virat Kohli : रोहित शर्मापासून पाँटिंगच्या शतकांपर्यंत, विराट कोहलीनं मोडले अनेक विक्रम

Asia Cup 2022, Virat Kohli : किंग विराट कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.

Asia Cup 2022, Virat Kohli : किंग विराट कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. त्यानं 61 चेंडूंत 12 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी उभारली.  विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारतानं अफगाणिस्तानचा 101धावांनी पराभव केला. या शतकी खेळीसह विराट कोहलीनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पाहूयात विराट कोहलीनं केलेले विक्रम... 

रोहित-राहुलचा विक्रम मोडला - 
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी करत राहुल आणि रोहित यांचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं रोहित शर्माचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर आता सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झाला आहे. विराट कोहलीनं 122 धावांची खेळी केली आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्मानं 118 धावांची खेळी केली होती.  राहुलच्या 110 धावांच्या शतकी खेळीचा विक्रमही विराट कोहलीनं मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या नावावर भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम झालाय. 

मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडला -  
विराट कोहलीनं वादळी शतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  विराट कोहलीनं मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढला आहे. मार्निट गप्टिलच्या नावावर 3500 धावा आहेत. विराट कोहलीच्या नावावर 3584 धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माच्या नावावर 3620 धावा आहेत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+  धावा करणारा फलंदाज - 
माजी कर्णधार विराट कोहलीनं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीनं रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं 33 व्यांदा 50+  पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं आतापर्यंत 32 वेळा 50+  जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात विराट कोहलीनं तीनवेळा 50+  पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात विराट कोहलीनं भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रम केलाय. 

24 हजार धावांचा विक्रम -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं सर्वात वेगवान 24 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.  याआधी सचिन तेंडुलकरने वेगवान 24 हजार धावांचा विक्रम केला होता. 

भारताकडून शतक झळकावणारे फलंदाज - 
टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली सहावा फलंदाज ठरलाय. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक झळकावली आहेत. रोहित शर्मानं टी 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक चार शतकं झळकावली आहेत. त्यानंतर राहुलच्या नावावर दोन शतकं आहेत.

आशिया चषकात सर्वाधिक धावा - 
यंदा भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीनं दोन अर्धशतक आणि एक शतक झळकावत यंदा आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय, 2012, 2016 मध्येही विराट कोहलीनं भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या होत्या.  
 
पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. विराट कोहलीनं पाँटिंगच्या 71 शतकांची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर 71 शतकांची नोंद आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Embed widget