Virat Kohli: टी-20 विश्वचषकात विराट कोहलीनं ओपनिंग करावी का? पाहा एबीपी न्यूजचा पोल
यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धतून (Asia Cup 2022) भारतीय संघ बाहेर झालाय. परंतु, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये परतल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Virat Kohli: यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धतून (Asia Cup 2022) भारतीय संघ बाहेर झालाय. परंतु, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये परतल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला (IND vs AFG) 101 धावांनी पराभूत केलं. विराट कोहली भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरलाय. या सामन्यात सलामीला येऊन विराट कोहलीनं नाबाद 122 धावांची धमाकेदार खेळी केली. जवळपास तीन वर्षांपासून शतकाच्या शोधात असलेल्या विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्ध सलामीला येऊन शतक झळकावलंय. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिलं शतक आहे. दरम्यान, एबीपी न्यूजनं टी-20 विश्वचषकात विराटच्या ओपनिंगबाबत पोल घेतला, ज्यातून आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत.
आगामी टी-20 विश्वचषकात विराट कोहलीनं ओपनी करावी का? असा प्रश्न एबीपी न्यूजच्या पोलमध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाला जवळपास 75 टक्के चाहत्यांनी होय असं उत्तर दिलंय. तर, 25 टक्के लोक नाही म्हणत आहेत.
ट्वीट-
विराटचं 1021 दिवसानंतर शतक
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून एक शतक झळकावता आलं नव्हतं. त्यानं नोव्हेंबर 2019 मध्ये अखेरचं शतक मारलं होतं. परंतु, काल अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यात आलेल्या विराटनं शतक झळकावलं. विराटनं तब्बल 1021 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे.
मार्टिन गप्टिलला मागं टाकलं
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिल्या शतकानंतर विराट कोहलीनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. आतंरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली सहावा भारतीय फलंदाज ठरलाय. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक झळकावली आहेत. रोहित शर्मानं टी 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक चार शतकं झळकावली आहेत. त्यानंतर राहुलच्या नावावर दोन शतकं आहेत. विराटनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटममधील 3 हजार 584 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मार्टिन गप्टिलला मागं टाकलंय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3500 हून अधिक धावा करणारा विराट दुसरा फलंदाज ठरलाय.
हे देखील वाचा-