एक्स्प्लोर

Virat Kohli : कोहलीची 'विराट' कामगिरी! 'हा' विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती; रोनाल्डो, मेस्सीच्या क्लबमध्ये सामील

Virat Kohli 250 Million Followers : भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे.

Virat Kohli Cross 250 Million Instagram Followers : भारतीय क्रिकेटपटू  (Indian Cricketer) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती (First Asian to Reach 250 Millions Followers) बनला आहे. इतकंच नाही तर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldo) हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू आहे. 'किंग' कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोहलीचे भारतातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत. 

विराट कोहली 'हा' विक्रम करणारा पहिला आशियाई

विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेलं नसून जगभरात प्रसिद्ध आहे. मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' विराट कोहली त्याची दमदार खेळी पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. कोहलीनं यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दोन शतकं ठोकली. यंदाच्या मोसमातून आरसीबी संघाचं आव्हान संपलं आहे. त्यामुळे सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात आरसीबी संघासाठी विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक आठ शतकं ठोकण्याचा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे. विराटनं सलग दोन सामन्यात शतकं ठोकली मात्र, संघाचा पराभव झाला. आयपीएल 2023 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आतापर्यंत आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता कमी होतेय की काय असे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

कोहलीचे इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स 

विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा  पहिला भारतीय आणि आशियाई बनला आहे. मेटा कंपनीची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफर्म इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या आशियाई व्यक्तींच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा कर्णधार एमएस धोनी 42.2 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 40.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी लंडनमध्ये

विराट कोहली भारतीय संघाच्या पहिल्या बॅचसह इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. लंडनमध्ये पार पडणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी विराट कोहली दोन आठवडे सराव करणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीसह मोहम्मद सिराज पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून, 2023 पासून लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या  :

Naveen Ul Haq : गोड, गोड आंबे... लखनौच्या पराभवानंतर नवीन-उल-हक ट्रोल; आरसीबीच्या चाहत्यांना मुंबईची साथ

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE हा निकाल एबीपी माझाच्या http://mh12.abpmajha.com या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'चा लाईव्ह ब्लॉग पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.