एक्स्प्लोर

Team India : 14 सामने, 365 दिवस, 250 पेक्षा जास्त विकेट; कसोटीत भारतीय गोलंदाजांचा दबदबा

Team India Test Records 2021 : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत भारतीय संघाने 2021 वर्षाचा शेवट गोड केला. 2021 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.

Team India Test Records 2021 : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत भारतीय संघाने 2021 वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सेंच्युरियन कसोटी सामन्यात 113 धावांनी विजय मिळवला. 2021 वर्ष भारतीय गोलंदाजांसाठी भरभराटीचे राहिले आहे. या वर्षात भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना नाकीनऊ आणलं. 2021 मध्ये कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 250 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय संघ ठरला. वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा (WTC) अपवाद वगळता प्रत्येक मालिकेत भारतीय संघाने आपला दबदबा राखला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानावर पराभूत केलं, यामध्ये भारतीय गोलंदाजांना मोलाचा वाटा होता. अनेक वर्षांपासून फलंदाजी भारतीय संघाची जमेची बाजू मानली जात होती. मात्र, 2021 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. घरच्या मैदानावर विदेशातही भारतीय गोलंदाजांनी आपला डंका वाजवला.  

कुणी घेतल्या सर्वाधिक विकेट?
2021 मध्ये भारतीय गोलंदाजांनी कसोटीमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी मिळून 252 विकेट घेतल्या आहेत. 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्यात भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक विकेट घेतल्या. अश्विनने 50 पेक्षा जास्त फलंदाजांना बाद केलं. मोहम्मद सिराजने 31 आणि जसप्रीत बुमराह याने 30 विकेट मिळवल्या आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर 23 विकेट आहेत. तर फिरकीपटू अक्षर पटेल याने 36 विकेट घेतलया आहेत. वर्षभराच्या कामगिरीवर नजर मारल्यास भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं आहे.  

कोणत्या संघाने घेतल्या सर्वाधिक विकेट?
2021 मध्ये भारतीय संघाने कसोटीत 252 विकेट घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या संघामध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. भारतीय संघाने 14 सामन्यात 252 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंड संघाने 15 सामन्यात 229 विकेट घेतल्या आहेत. तर 161 विकेट घेत वेस्ट इंडिंज तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तान संघाने 153 विकेट्स घेतल्या आहेत.  

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shiv Sena Uddhav Thackeray Group  Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चाEknath Shinde Ratnagiri Speech| दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचे आक्रमक भाषणSuresh Dhas On Santosh Deshmukh Case:धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यायला पाहिजे होती : धसChhaava movie review: विकी कौशलचा 'छावा' सिनेमा कसा आहे? पहिला मराठी रिव्ह्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक, 68 व्या ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक, रांचीतील स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.