(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women's T20 World Cup 2024 : जगाला मिळणार नवा टी-20 चॅम्पियन! आज रंगणार SA vs NZ फायनल थरार, जाणून घ्या भारतात LIVE सामना कुठे पाहायचा?
Sa vs Nz Womens T20 World Cup 2024 Final : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. पहिल्यांदाच जगाला नवा टी-20 चॅम्पियन मिळणार आहे.
South Africa vs New Zealand Women T20 World Cup 2024 Final : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 थरार 3 ऑक्टोबरपासून रंगला होता. तेव्हापासून चाहत्यांना यूएईमध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. स्पर्धेच्या 2 आठवड्यांनंतर अंतिम फेरीतील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. अशा परिस्थितीत आता आज 20 ऑक्टोबरला दुबईत होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यांची सर्व क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे. महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ अंतिम सामना खेळले असले तरी आजपर्यंत त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच नवा चॅम्पियन मिळणार आहे.
With eyes on the 🏆 at Dubai's Museum of the Future 👀
— T20 World Cup (@T20WorldCup) October 19, 2024
A historic final awaits at the Women's #T20WorldCup 2024 🇿🇦🇳🇿#WhateverItTakes pic.twitter.com/cRIzGVx2r7
दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. गेल्या वेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांना प्रथमच चॅम्पियन बनण्याची संधी आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करूनच अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. दुसरीकडे, न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा पराभव करत जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले. या स्पर्धेपूर्वी 2024 मध्ये न्यूझीलंडची कामगिरी अत्यंत खराब होती. संघाला एकच विजय मिळाला. मात्र या स्पर्धेत प्रवेश करताच न्यूझीलंड वेगळ्याच शैलीत दिसला. त्याने पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाकडून एकमेव पराभव पत्करावा लागला असला तरी इतर संघांना पराभूत करण्यात ते यशस्वी ठरले.
The captains of the Women's T20 World Cup 2024 finalists pose with the trophy.🏆
— CricTracker (@Cricketracker) October 19, 2024
Who will claim their maiden title?
📸: ICC#SAWvsNZW pic.twitter.com/jairQ6G3Um
दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप अंतिम सामना LIVE कुठे पाहायचा?
अंतिम सामना तारीख आणि दिवस : 20 ऑक्टोबर 2024, रविवार
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
वेळ : अंतिम सामना IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
थेट प्रवाह : Disney+Hotstar ॲप आणि वेबसाइट
टीव्हीवर कुठे पाहायचा : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे -
दक्षिण आफ्रिका महिला संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिजने कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखने. अयांदा हलुबी, शेषानी नायडू, मिके डी रिडर.
न्यूझीलंड महिला संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, जेस केर, हॅना रोवे, लेह कास्परेक.