Jalna Crime News : लोखंडी सळईने अंगभर चटके देणाऱ्या ठाकरे गटाचा पदाधिकारी नवनाथ दौडचा आणखी एक कारनामा उघड; पैशाच्या वादातून अंगावर गेला धावून अन्..
Jalna Crime News : पैशाच्या वादातून नवनाथ दौड कुऱ्हाड घेऊन एका व्यक्तीच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या कार्यकर्त्यांच्या हातात देखील लाठ्या काठ्या असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

जालना: गेल्या काही दिवसांमध्ये मारहाणीच्या घटना आणि राजकीय वरदहस्त या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच चटके देऊन धनगर तरुणाचा अमानुष छळ केल्याप्रकरणातील आरोपी उबाठा तालुका अध्यक्ष नवनाथ दौडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पैशाच्या वादातून नवनाथ दौड कुऱ्हाड घेऊन एका व्यक्तीच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या कार्यकर्त्यांच्या हातात देखील लाठ्या काठ्या असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. तर आरोपी नवनाथ दौड हा तालुक्यात सावकारकी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी एक व्हिडिओ व्हायरल
दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. एका धनगर तरुणाला मंदिरात का गेला म्हणून आरोपीने अमानुष पद्धतीने लोखंडी सळईने चटके दिले होते. या प्रकरणी भागवत दौड, गंगाधर काळे, रामू काळे या तीन आरोपींना जालन्यातील पारध पोलिसांनी अटक केले असून यातील आरोपी शिवसेना उबाठाचा तालुकाध्यक्ष अजून फरार आहे. दरम्यान शिवसेना उबाठाचा तालुका अध्यक्ष नवनाथ दौड याची मोठी गुन्ह्याची पार्श्वभूमी असून पंचक्रोशीत याची दहशत असल्याचं बोललं जातंय.
नवनाथ दौड याच्यावर जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधील विविध पोलीस, मारहाण, जमावं जमवून दंगल करणे, धमकी देणे आत्महत्येस प्रवूर्त करणे, बनावट व्होटर कार्ड, तत्सम कागद करून फसवणूक केल्याप्रकरणीची विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नवनाथ दौड याच्यावर दाखल गुन्हे
1. गुन्हा क्र. 53/2017 – कलम 420, 465 IPC ... नुसार बनावट कागदपत्र तसेच खोटे शिक्के मारून बनावट वोटर कार्ड बनवल्या प्रकरणी जालन्यातील पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
2. गुन्हा क्र. 13/2019 – कलम 294 IPC – कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
3. गुन्हा क्र. 77/2011 – कलम 306, 34 IPC – नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर मधील अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
4. गुन्हा क्र. 30/2019 – कलम 160 IPC – सार्वजनिक ठिकाणी दंगल केल्या प्रकरणी जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
5. गुन्हा क्र. 506/2024 – कलम 356 BNS सह 2, 3 कलमा नुसार, अब्रू नुकसान अभद्र बोलल्याप्रकरणी नरबळी अधिनियमा अंतर्गत जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
6. गुन्हा क्र. 64/2005 – कलम 144, 148, 149, 323, 324, 504, 506 – कलमा नुसार पाच पेक्षा अधिक लोक जमून सार्वजनिक ठिकाणी जमाव जमउन ,मारहाण तसेच धमकी दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर मधील सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.



















