Santosh Deshmukh Photos Videos: संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर, कळवळत असतानाही हैवान मारत राहिले
Beed Crime Santosh Deshmukh case: संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली. संतोष देशमुख यांचे कपडे काढून मारहाण करण्यात आली.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी निर्घृणपणे केलेल्या मारहाणीचा आणखी एक व्हीडिओ समोर आला आहे. आरोपी महेश केदार याच्या मोबाईलमध्ये एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटो संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांना अमानुष मारहाण करताना काढले गेले. या व्हिडिओमधील विवरण एसआयटीने आरोपपत्रात लिहिले आहे. हा तपशील अंगावर शहारे आणणारा आहे. या व्हिडीओंमध्ये संतोष देशमुख यांचे कपडे काढताना आणि त्यांचे केस धरुन त्यांना मारहाण करतानाचे चित्रण आहे. संतोष देशमुख हे मला मारु नका, अशी विनवणी करताना दिसत आहेत. मात्र, तरीही आरोपींनी त्यांना मारहाण सुरु ठेवली. 6 नोव्हेंबर 2025 रोजी आवादा कंपनीत घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन देत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. आरोपी तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या अशा दोन पाईपच्या साहाय्याने संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी आरोपींनी संतोष देशमुख यांच्या तोंडातून 'सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे', असे वदवूनही घेतले. हे सर्व व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे आहेत.
महेश केदार याने 3 वाजून 45 मिनिटांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. पहिला व्हिडिओ एक मिनिट 10 सेकंदाचा काढला. 3 वाजून 47 मिनिटांना पुन्हा 53 सेकंदाचा व्हिडीओ काढला. तीन वाजून 48 मिनिटांनी पुन्हा पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ काढण्यात आला . तीन वाजून पन्नास मिनिटांनी एक फोटो काढला. तीन वाजून 52 मिनिटांनी पुन्हा 2.4 सेकंदाचा व्हिडिओ काढला. यानंतर 3:53 मिनिटांनी सात सेकंदाचा, 3:54 मिनिटांनी 36 सेकंदांचा ,तीन वाजून 55 मिनिटांनी 14 सेकंदाचा, 3:55 मिनिटांनी चार सेकंदाचा ,तीन वाजून 58 मिनिटांनी दोन सेकंदाचा, 3:59 मिनिटांनी पाच सेकंदाचा ,तीन वाजून 59 मिनटं 18 सेकंदाला पुन्हा 12 सेकंदाचा व्हिडिओ काढला, पाच वाजून 34 मिनिटांनी एक मिनिट 44 सेकंद ,पाच वाजून 35 मिनिटांनी पुन्हा एक मिनिटाचा व्हिडिओ काढला आणि पाच वाजून 53 मिनिटांनी 24 सेकंदाचा व्हिडिओ काढण्यात आला. याचदरम्यान महेश केदार याने संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे एकूण आठ फोटोही काढले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो बाहेर आले आणि त्यातून हत्येची तीव्रता आणि आरोपीची मानसिकता समोर आली. संतोष देशमुख यांना मारहाण करताना यातील महेश केदार नावाच्या आरोपीने मारहाणी दरम्यान 15 व्हिडिओ आणि आठ फोटो काढले. या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचे अमानुष मारहाण करीत आहेत. यात त्यांना बळजबरीने 'सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे', असं म्हणायला सांगितले.
आणखी वाचा
संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टेम रिपोट, अंगभर जखमा अन् काळनिळं पडलेलं शरीर
























