एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 : भारतानं 17 वर्षानंतर टी20 वर्ल्ड कप जिंकला? ड्रेसिंग रुममध्ये काय काय घडलं, सर्व अपडेट समोर
T20 World Cup 2024 : भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये देखील जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. विराट कोहली अन् रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले.

ड्रेसिंग रुममध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष
1/5

भारतानं टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. ही ट्रॉफी जिंकणं प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्न असतं. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण होतं. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी भाषणं केली.
2/5

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये छोटसं भाषण केली.
3/5

भारताच्या विजयानंतर खेळाडूंनी ट्रॉफी सोबत फोटोसेशन केलं. जसप्रीत बुमराह देखील ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित होता.
4/5

विराट कोहलीनं देखील ड्रेसिंग रुममध्ये टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटो काढले. विराटनं 76 धावांची खेळी केली होती. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.
5/5

सूर्युकमार यादवला फलंदाजीत कमाल करता आली नसली तरी त्यानं अफलातून कॅच घेत संघाला मॅचमध्ये परत आणलं. डेव्हिड मिलरचा 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये घेतलेली विकेट गेमचेंजर ठरली.
Published at : 30 Jun 2024 04:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
