एक्स्प्लोर
कॅच सोडल्याची भरपाई म्हणून डिनर देणार, रोहित शर्मानं शब्द दिला पण पूर्ण केला का? अक्षर पटेल म्हणाला...
Rohit Sharma Axar Patel : भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये एक कॅच सोडला होता.

अक्षर पटेल रोहित शर्मा
1/7

भारतीय क्रिकेट संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंत न सामने जिंकले आहेत. बांग्लादेश आणि पाकिस्तानला पराभूत करत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
2/7

भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं बांगलादेश विरुद्धच्या मॅचनंतर अक्षर पटेलला डिनरसाठी घेऊन जाणार असल्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द रोहित शर्मा कधी पूर्ण करणार याकडे लक्ष लागलं आहे.
3/7

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्राफीतील मॅचमध्ये अक्षर पटेल डावाची नववी ओव्हर टाकत होता. अक्षरनं सलग दोन बॉलवर दोन विकेट घेतल्या होत्या. तिसऱ्या बॉलवर त्याला हॅटट्रिक करण्याची संधी होती.
4/7

अक्षर पटेलनं पहिल्या दोन बॉलवर तंजीद हसन आणि मुशफिकुर रहीम याला बाद केलं. यानंतर तिसऱ्या बॉलवर जाकिर अलीचा कॅच रोहित शर्माकडून सुटला.
5/7

रोहितनं कॅच सोडल्यानं अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली. रोहित शर्मानं मॅच जिंकल्यानंतर अक्षर पटेलला डिनरला नेण्याचा शब्द दिला होता.
6/7

पाकिस्तान विरूद्धच्या मॅचनंतर अक्षर पटेलला रोहित शर्मानं डिनरला नेलं का असा विचारलं असता त्यानं आमच्याकडे अजून सहा दिवसांचा वेळ आहे. या काळात रोहित डिनरला नेईल, असं अक्षर पटेल म्हणाला.
7/7

भारतीय क्रिकेट संघानं दोन मॅच जिंकल्या आहेत. यामध्ये अक्षरनं 3 विकेट घेतल्या आहेत. भारताचा पुढील सामना 2 मार्चला इंग्लंड विरुद्ध होणार आहे.
Published at : 26 Feb 2025 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
