एक्स्प्लोर
Semi Final Chances Champions Trophy 2025: पावसाने खेळ बिघडवला, ग्रुप B मधील चारही संघांना सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी, कोण मारणार बाजी?
Semi Final Chances Champions Trophy 2025: पावसामुळे सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघांची निराशा झाली.
Semi Final Chances Champions Trophy 2025
1/10

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला.
2/10

पावसामुळे सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघांची निराशा झाली.
3/10

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेला प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले.
4/10

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेतील बी गटात आता दक्षिण अफ्रिका 3 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ देखील 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
5/10

इंग्लंडच्या संघासाठी पाऊस लॉटरीपेक्षा कमी नाही. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारणारा इंग्लंड आता हा सामना रद्द झाल्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा दावेदार बनला आहे.
6/10

भारत आणि न्यूझीलंड यांनी ग्रुप अ मधून आधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, परंतु ग्रुप ब मधील कोणताही संघ आतापर्यंत टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. आतापर्यंत ग्रुप-ब मधील प्रत्येक संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्याची संधी आहे.
7/10

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्यानंतर, आता इंग्लंडला बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. यानंतर त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. जर इंग्लंड संघाने हे दोन्ही सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
8/10

एवढेच नाही तर आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे कोणताही संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकलेला नाही. आता या दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचा शेवटचा सामना जिंकावाच लागेल.
9/10

ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होईल. तर दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे.
10/10

आता अफगाणिस्तानलाही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. तथापि, त्याचा मार्ग खूप कठीण आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी अफगाणिस्तानला प्रथम इंग्लंडला हरवावे लागेल आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल. जर अफगाणिस्तानने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ती टॉप-4 मध्ये स्थान मिळवेल.
Published at : 26 Feb 2025 07:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















