एक्स्प्लोर
ZIM vs PAK : झिम्बॉब्वेनं पाकिस्तानला लोळवलं, अखेरच्या टी 20 सामन्यात पलटवार अन् शेवट गोड केला
PAK vs ZIM : झिम्बॉब्वेनं पाकिस्तानला तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये दोन विकेटनं पराभूत केलं. पाकिस्तानला अखेरच्या टी 20 मध्ये झिम्बॉब्वेनं धक्का दिला.

झिम्बॉब्वेनं पाकिस्तानला लोळवलं
1/5

झिम्बॉब्वेनं तिसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला 2 विकेटनं पराभूत केलं आहे. झिम्बॉब्वेनं पाकिस्तानला गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केलं. झिम्बॉब्वेनं पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात 80 धावांनी पराभूत केलं होतं.
2/5

पाकिस्ताननं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली मात्र त्यांना तिसऱ्या टी 20 मध्ये पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 132 धावा केल्या.
3/5

झिम्बॉब्वेनं या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. ब्रायन बेनेट आणि तदिवानाशे मरुमानी या दोघांनी 40 धावांची भागिदारी केली.
4/5

मरुमानीनं 6 बॉलमध्ये 15, ब्रायननं 35 बॉलमध्ये 43 धावांची खेळी केली. डियोन मायर्सनं 18 ब़लमध्ये 13 धावा केल्या. सिकंदर रजानं 20 बॉलमध्ये 19 धावा केल्या.
5/5

झिम्बॉब्वेनं दोन विकेटनं विजय मिळवला. झिम्बॉब्वेनं एकदिवसीय सामन्यानंतर टी 20 मध्येही पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला.
Published at : 05 Dec 2024 10:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
