Dhanashree-Yuzvendra Chahal Divorce Reason: खरं कधी लपत नाही... धनश्री आणि युजवेंद्रचा घटस्फोट का झाला? सत्य समोर आलंच
Dhanashree-Yuzvendra: धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा कित्येक दिवसांपासून रंगल्यात, पण आता त्यांचा घटस्फोट झाल्याचं बोलंल जात आहे. पण, दोघांचं वेगळं होण्याचं नेमकं कारण काय?

Dhanashree-Yuzvendra Chahal Divorce Reason: टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांचा नुकताच घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. दोघांचंही लग्न तुटलं आणि आता दोघेही कायमचे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. लग्नाच्या दोन वर्षांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आणि दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या कित्येक दिवसांपासून दोघेही वेगळं होण्याचं नेमकं कारण काय? याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. आता अखेर धनश्री आणि युजवेंद्रचा घटस्फोट का झाला? याचं खरं कारण समोर आलं आहे.
धनश्री आणि चहलचा घटस्फोट का झाला?
खरंतर, धनश्री आणि युजवेंद्र दोघेही वेगळं होण्यामागील खरं कारण ज्येष्ठ पत्रकार विक्की लालवानी यांनी सांगितलं आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आणि दोघांच्या घटस्फोटामागील खरं कारण नेमकं काय? याचा खुलासा केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्की लालवानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, युजवेंद्र आणि धनश्री यांच्यात वेगळं होण्याचं कारण धनश्रीची मुंबईत राहण्याची इच्छा होती. तिनं कित्येकदा युजवेंद्रला हरियाणामधील त्याचं घर सोडण्याचा आग्रह केला. धनश्री आणि युजवेंद्र यांचं पर्सनॅलिटी एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
View this post on Instagram
विक्की यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "एका सूत्रानं सांगितलं आहे की, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं कधीच पटलं नाही, कारण ते दोघे पूर्णपणे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे आहेत. अचानक, एक दिवस धनश्रीनं तिचा पाय कोणत्यातरी गोष्टीवर लावला, ज्यामुळे युजी खुर्चीवरून पडला. लेग स्पिनरला धक्का बसला. त्याने धनश्रीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिची मागणी योग्य नाही. दोघांनीही चर्चा केली, वाद घातला आणि भांडण केले. धनश्रीची इच्छा होती की युजीने त्याच्या बॅगा आणि मुंबईला हलवावं आणि दोघांनीही तिथेच राहावं."
युजवेंद्रला आपल्या आई-वडिलांचं घर सोडायचं नव्हतं
विक्की यांनी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पुढे दावा केला आहे की, धनश्री युजवेंद्र आणि त्याच्या पालकांसोबत राहण्यासाठी हरियाणाला गेली होती. जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा ती मुंबईत यायची. दुसरीकडे, युजवेंद्र त्याच्या निर्णयावर ठाम होता की, तो त्याच्या घरापासून आणि शहरापासून स्वतःला दूर करणार नाही.
पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "लग्न झाल्यानंतर, युजी आणि धनश्री युजीच्या पालकांसोबत हरियाणामध्ये राहायला गेले आणि जेव्हा त्यांची कामं असायची तेव्हाच ते मुंबईत यायचे. सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला प्रश्न युजवेंद्र आणि धनश्रीचा घटस्फोट का झाला? याचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच होतं. युजवेंद्रनं स्पष्ट केलं की, तो त्याच्या पालकांपासून दूर राहणार नाही."
दरम्यान, या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. कारण दोघांनी घटस्फोटाचं कारण उघड केलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























