एक्स्प्लोर
IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध विराट, रोहित, राहुल फेल, यशस्वी, जडेजाची अर्धशतकं, अश्विनचं होमग्राऊंडवर शतक, पहिल्या दिवशी काय घडलं?
IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आर. अश्विननं होमग्राऊंडवर शतक झळकावलं.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी
1/5

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीला आज सुरुवात झाली. भारताचे दिग्गज फलंदाज आज दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल मोठी धावसंख्या करु शकले नाहीत.
2/5

बांगलादेशच्या हसन महमूदनं भारताला चार धक्के दिले. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंतला त्यानं बाद केलं. रिषभनं चांगली सुरुवात केली होती मात्र तो 39 धावांवर बाद झाला.
3/5

भारताचा सलामीवर यशस्वी जयस्वाल ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी दमदार कामगिरी करत आहे. यशस्वी जयस्वालनं अर्धशतकी खेळी केली. त्यानं 56 धावा केल्या.
4/5

रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला. अश्विननं होम ग्राऊंडवर शतक झळकावलं.तर, रवींद्र जडेजानं 86 धावा केल्या. अश्विन आणि जडेजानं 195 धावांची भागिदारी केली.
5/5

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रवींद्र जडेजा पहिल्यांदा कसोटी सामन्याच्या निमित्तानं मैदानात उतरला होता. आज त्यानं 86 धावांची खेळी करत भारताला अडचणीतून बाहेर काढलं.
Published at : 19 Sep 2024 06:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
