एक्स्प्लोर

Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका

Raj Thackeray Speech : गंगेमध्ये प्रेत अर्धवट जाळून टाकले जातात आणि त्या ठिकाणचं पाणी प्यायला सांगता? अशा धर्माचं काय करायचं असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. 

Raj Thackeray Speech : कुंभमेळ्याचं पाणी प्यायलो नाही असं म्हटल्यावर नवीन वारं गेलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान करतोय. पण प्रश्न हा कुंभमेळ्याचा नाही तर गंगेच्या पाण्याचा आहे असं राज ठाकरे  म्हणाले. गंगेमध्ये अर्धवट जाळलेली प्रेतं टाकली जातात. गंगेचं पाणी हे पिण्यासाठी नाही तर अंघोळीसाठीही योग्य नाही असं राज ठाकरे म्हणाले. ज्यांना या गोष्टी कळत नाहीत त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नयेत असंही राज ठाकरे यांनी ठणकावलं. 

प्रश्न हा कुंभमेळ्याचा अपमान करण्याचं किंवा गंगेचा अपमान करण्याचं नाही. प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा असं सांगत राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये गंगेच्या प्रदूषणाची कथा, अर्धवट जळालेली प्रेतं आणि इतर गोष्टी दाखवण्यात आल्या.

Raj Thackeray Speech : काय म्हणाले राज ठाकरे? 

पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळ्यातून पाणी आणलेलं पिणार नाही असं सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. ज्या नदीला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्यांची अवस्था ही भीषण आहे. गंगा साफ करावी असं पहिल्यांदा राजीव गांधी यांनी म्हटलं. त्यांनी ते कामही सुरू केलं. तेव्हापासून अजूनही गंगा साफ होतेय. मोदींनीही तेच सांगितलं. 

आपल्याकडच्या देशातल्या नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिण्याचं सोडाच पण अंघोळही करू शकत नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर अनेकजण आजारी पडल्याचं एकाने सांगितलं. 

गंगेच्या शुद्धीकरणावर 33 हजार कोटी खर्च करण्यात आलं आहे. एका महंताला तसंच टाकून देण्यात आलं. अर्धवट प्रेत जाळले जातात आणि तसेच गंगेत टाकले जातात. 

जर धर्म अशा प्रकारे आडवा येत असेल तर काय करायचं याचं? काळ बदलला. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हेच सगळे विधी आटपण्यासाठी त्या घाटावर एक वेगळी जागा करता येत नाही का?

कुंभमेळ्यामध्ये 65 कोटी जनता येऊन गेले असं सांगण्यात आलं. म्हणजे अर्धा भारत आला का? 

महाराष्ट्रातल्या नद्यांचीही हीच परिस्थिती आहे. सावित्री नदीची अवस्थाही तीच आहे. देशभरात 311 नदीपट्टे हे प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे. 

ईव्हीएमवरून सरकारला निशाणा

ज्यांनी मनसेला मतदान करून ज्यांची मतं दिसली त्यांचे आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करूनही, इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये ज्यांची मतं दिसली नाही त्यांचंही आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या यावर बोलून झालंय. आज अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या, नेमकं आजच का दिल्या हे मला समजलं. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या, पण...; नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, काय-काय म्हणाले?
जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या, पण...; नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, काय-काय म्हणाले?
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Nashik Crime Hit and run: नाशिकच्या सातपूर परिसरात 'हिट अँड रन' चा थरार; रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवलं, जागीच अंत!
नाशिकच्या सातपूर परिसरात 'हिट अँड रन' चा थरार; रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात ट्रकने उडवलं, जागीच अंत!
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Embed widget