एक्स्प्लोर
In Pics : पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी मोठा विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी
IND vs BAN 1st Test : पहिल्या कसोटी सामनन्यात दमदार फलंदाजी करत एक मोठं 513 धावाचं लक्ष्य बांगलादेशसमोर ठेवलं होतं, जे पार करताना 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला.

IND vs BAN
1/11

बांगलादेश दौऱ्यातील पहिला कसोटी सामना भारतानं तब्बल 188 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला आहे.
2/11

या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
3/11

विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी भारतानं सर्व आगामी कसोटी सामने जिंकणं महत्त्वाचं असल्याने त्याची सुरुवात चांगली झाली आहे.
4/11

ज्यानंतर कुलदीपनं कमाल गोलंदाजी करत 5 तर सिराजनं 3 विकेट घेत अवघ्या 150 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपला.
5/11

ज्यानंतर पुजारा आणि गिलच्या शतकाच्या जोरावर भारतानं 258 धावा करत दुसरा डाव घोषित केला आणि 513 धावांचं मोठं आव्हान बांगलादेशला दिलं.
6/11

सामन्यात भारतानं पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या 90 तर श्रेयस अय्यरच्या 86 धावांच्या जोरावर 404 धावसंख्या स्कोरबोर्डवर लावली.
7/11

हे लक्ष्य पूर्ण करताना बांगलादेशनं झुंज दिली पण अखेर कुलदीप आणि अक्षर यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला.
8/11

आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
9/11

सामान्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षणही चांगलं केल.
10/11

पुजारा, गिल यांच्या शतकामुळं भारताचा कसोटी संघ पुन्हा फॉर्मात आल्याचं दिसून येत आहे.
11/11

सामनावीर म्हणून सर्व डावात कमाल गोलंदाजी तर पहिल्या डावात महत्त्वूर्ण फलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवला गौरवण्यात आलं.
Published at : 18 Dec 2022 07:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बीड
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
