एक्स्प्लोर

धुलिवंदनाला जबरदस्ती रंग लावला, जाब विचारायला गेलेल्या तरुणावर कोयता हल्ला करत पोटात दगड घातला, पुण्यात खळबळ

धुलीवंदनादिवशी घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime: पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये सध्या मोठी वाढ झालीय. किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, दारूच्या नशेत होणारे राडे, अत्याचार, वाहनांची तोडफोड, कोयता हल्ल्यांसारख्या हिंसक घटनांनी पुणे गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर चर्चेत आहे. दरम्यान, आता आणखी एका घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. धुलीवंदनादिवशी भावावर रंग टाकल्याचा जाब विचारल्याने दोन तरुणांनी जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. पुण्यातील येरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेनंतर तक्रार द्यायला गेलेल्या तरुणाची तक्रार घ्यायला पोलिसांनी उशीर केल्याचा आरोप या तरुणाने केलाय. त्यामुळे पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ऋतिक मनोहर ननावरे(22) असे जखमी तरुणाचे नाव आहे.  धुलीवंदनादिवशी घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Koyta Attack)

नक्की घडले काय?

धुलिवंदन म्हटले की आपलेच राज्य अशा आर्विभावात वावरणाऱ्यांची कमी नाही. मग लहान असो किंवा मोठा कोणालाही रंग फासला, डोक्यात अंडी फोडली तरी काय होते अशा माजात अनेकजण वावरताना दिसतात.  पुण्यात  येरवडा भागातून धुलिवंदनादिवशी जात असताना रात्री 8.30 च्या सुमारास दोन भावांना जबरदस्तीने काही तरुणांनी रंग लावला. डोक्यात अंडी फेकून मारली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला दोन जणांनी  बेदम मारहाण केली. हे प्रकरण मारहाणीवर थांबले नाही. या दोन तरुणांनी रागाच्या भरात कोयत्याने वार करत एकाला जखमी केला. इतकंच नाही. दोघांनी तरुणाच्या पोटात दगड घातला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांमध्ये तक्रार देण्यास गेलेल्या तरुणाला पोलिसांनी "रंग पंचमी ची भांडणं करतो का?" असा उलटा जबाब विचारला आणि तक्रार घ्यायला पोलिसांनी उशीर केला अशी माहिती स्वतःऋतिक यांनी दिली आहे. याप्रकरणी बबल्या (पूर्ण नाव माहिती नाही), त्याचा मित्र अशा दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ऋतिक मनोहर ननावरे (22) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धुलीवंदन दिवशी रात्री 8.30 वाजता येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संगमवाडी येथे घडली. फिर्यादी ऋतिक यांचे भाऊ रोहित ननावरे (17) हे राजीव गांधी नगर परिसरातून जात असताना 2 तरुणांनी त्यांना जबरदस्तीने रंग लावून त्यांच्या डोक्यावर अंड फोडलं. ही बाब रोहित यांनी त्यांच्या भावाला येऊन सांगितली. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारायला  गेलेल्या ऋतिक वर बबल्या आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून त्याला मारहाण करत कोयत्याने वार केले. इतकचं नाही तर त्या दोघांनी ऋतिक यांना पोटात दगड घातला. या हल्ल्यात ऋतिक जखमी झाले

हेही वाचा:

Beed Crime: बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget