Chhaava Box Office Collection Day 31: 31 व्या दिवशी 'छावा' सुस्साट; रचला इतिहास, कमाईच्या बाबतीत दिग्गजांना पाणी पाजून ठरला सर्वात अव्वल
Chhaava Box Office Collection Day 31: विक्की कौशलचा 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. प्रदर्शित झाल्याच्या पाचव्या रविवारीही या चित्रपटानं उत्तम कलेक्शन केलंय.

Chhaava Box Office Collection Day 31: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे आणि दररोज पैसे कमवत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत त्याच्या बजेटपेक्षा कित्येक पट जास्त नफा कमावला. पण त्याच्या कमाईचा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 'छावा'नं रिलीजच्या 31 व्या दिवशी म्हणजेच, पाचव्या रविवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा' नं 31 व्या वर्षी किती कोटींची कमाई केली?
'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटात विक्की कौशलनं मुख्य भूमिका साकारली आहे. हा ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे आणि 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला आहे. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच भरपूर कमाई करत आहे आणि रिलीजच्या एक महिन्यानंतरही प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ शिगेला पोहोचली आहे, इतकी की रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही 'छावा' प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी झाला आहे आणि त्याचबरोबर पाचव्या रविवारीही त्यानं बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर,
- 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 180.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- 'छावा'नं तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपये कमावले होते.
- चौथ्या आठवड्यात 'छावा'नं 55.95 कोटी रुपये कमावले.
- 29 व्या दिवशी चित्रपटानं 7.25 कोटी रुपये कमावले.
- 30 व्या दिवशी 'छावा'नं 7.9 कोटी रुपये कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 31 व्या दिवशी म्हणजेच, 5 व्या रविवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं 31 व्या दिवशी 8 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा'ची 31 दिवसांत एकूण कमाई आता 562.65 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
'छावा'नं 31 व्या दिवशी सर्व चित्रपटांचा विक्रम मोडला
पाचव्या आठवड्याच्या शेवटीही 'छावा'ची क्रेझ प्रेक्षकांच्या मनातून गेलेला नाही. यासह, हा चित्रपट 31 व्या दिवशी 8 कोटींची कमाई करून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. एवढंच नाही तर, 'छावा'नं अनेक चित्रपटांना पछाडलं आहे.
- 'छावा'नं 31 व्या दिवशी 7 कोटी रुपये कमावलेत.
- उरी द सर्जिकल स्ट्राईकने 31 व्या दिवशी 5.66 कोटी रुपये कमावले.
- स्त्री 2 नं 31व्या दिवशी 5.4 कोटी रुपये कमावले होते.
- पुष्पा 2 चा 31व्या दिवसाचा कलेक्शन 4.4 कोटी रुपये होता.
- तान्हाजीचा 31व्या दिवसाचा व्यवसाय 3.45 कोटी रुपयांचा होता.
- बाहुबली 2 नं 31 व्या दिवशी 3.16 कोटी रुपये कमावले होते.
- दंगलनं 31व्या दिवशी 2.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

