Video : युवराज सिंग अन् कॅरेबियन खेळाडूची भर मैदानात बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर गेले धावून; अखेर ब्रायन लारा आला अन्...
टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग मैदानात नेहमीच त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

Yuvraj Singh and Tino Best IML T20 2025 : टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग मैदानात नेहमीच त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काळात खेळताना विरोधी संघाविरुद्ध मैदानात युवराज सिंगचे अग्रेशन हे खूप पाहायला मिळायचे. त्यामुळे अनेक वेळा त्याचे दुसऱ्या संघातील खेळाडूंशी भांडणही झाली आहे. युवराज आता निवृत्त झाला आहे, पण त्याच्यातील अग्रेशन अजूनही आहे आणि याचे एक उदाहरण आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात पाहिला मिळाले, जेव्हा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि वेस्ट इंडिज मास्टर्सचा गोलंदाज टिनो बेस्ट यांच्यात मैदानात भांडण झाले.
आजकाल जगाच्या कोणत्या-कोणत्या भागात अनेक क्रिकेट लीग सुरू आहेत. दरम्यान, भारतासह जगभरातील संघांचे माजी प्रसिद्ध खेळाडू आंतरराष्ट्रीय मास्टर्स टी-20 लीगमध्ये खेळताना दिसले. जेव्हा हे खेळाडू त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकमेकांशी भिडले, तेव्हा अनेकदा जोरदार वादविवादही झाले. पण निवृत्तीनंतर हे सामने सहसा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळले जातात, परंतु या अंतिम सामन्यात जे दृश्य दिसले ते क्वचितच कोणी अपेक्षा केले असेल.
View this post on Instagram
युवराज सिंग अन् टिनो बेस्ट फाईटची भर मैदानात बाचाबाची
भारत आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान युवराज आणि बेस्टमध्ये वाद झाला. हे सर्व इंडिया मास्टर्सच्या फलंदाजीदरम्यान घडले. या अंतिम सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि सहज विजयाकडे वाटचाल करत होता. दरम्यान, 13 व्या षटकानंतर युवराज आणि विंडीजचा वेगवान गोलंदाज बेस्ट यांच्यात कशावरून तरी शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि खूप रागाने बोलत होते. दोघांमधील ही लढत पाहून इतर खेळाडूंनाही हस्तक्षेप करावा लागला. अखेर दिग्गज ब्रायन लारा आला आणि कसा तरी हा वाद मिटवण्यात आला.
अंतिम सामन्यात भारताचा शानदार विजय
आता ही बाचाबाची का झाली हे स्पष्ट नाही, परंतु युवराजने संघाला विजयाकडे नेऊन त्याचा बदला घेतला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 148 धावा केल्या. त्यांच्याकडून लेंडल सिमन्सने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर भारताकडून वेगवान गोलंदाज आर. विनय कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल, अंबाती रायुडूच्या तुफानी 74 धावांच्या मदतीने इंडिया मास्टर्सने 18 व्या षटकात केवळ 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि अंतिम सामना तसेच ट्रॉफी 6 विकेट्सने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

