एक्स्प्लोर
King Charles Coronation: राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकापूर्वी 'या' चित्रांमधून पाहा राणी एलिझाबेथ II चा राज्याभिषेक!
King Charles Coronation: ब्रिटनचा राजा चार्ल्स III यांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. किंग चार्ल्स (तिसरा) आज राजघराण्याचा 40वा सम्राट बनणार आहे.

Queen Elizabeth
1/8

एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर ही तिचे वडील किंग जॉर्ज VI यांच्या आकस्मिक निधनानंतर फेब्रुवारी 1952 मध्ये राणी एलिझाबेथ बनली.
2/8

एलिझाबेथ II च्या राज्याभिषेकाच्या समारंभाला 8,000 पाहुणे उपस्थित होते. याशिवाय 27 दशलक्ष लोकांनी हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्टद्वारे पाहिला होता.
3/8

किंग जॉर्जच्या आकस्मिक निधनाने जगाला धक्का बसला, कारण एलिझाबेथ तिच्या वडिलांच्या केवळ 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर लगेच सिंहासनावर बसेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
4/8

राणीचे आगमन भव्य होणार होते आणि त्यासाठी प्रिन्स फिलिप यांच्या नेतृत्वाखाली राज्याभिषेक समितीने सुंदर सोनेरी घोडागाडीची व्यवस्था केली होती. तथापि, त्याची आसनव्यवस्था इतकी आरामदायी नव्हती.
5/8

एलिझाबेथ II चा गाऊन डिझाईन करण्यात स्वत: एलिझाबेथची प्राथमिक भूमिका होती. सर नॉर्मन हार्टनेल यांनी राणीसाठी ड्रेस बनवला होता. तिचा पांढरा डचेस साटनचा ड्रेस होता.
6/8

राणी एलिझाबेथची सँडल देखील अनन्यसाधारण होती. फ्रेंच शूमेकर रॉजर व्हिव्हियर आणि ब्रिटीश शूमेकर डेलमन लिमिटेड यांनी डिझाइन केलेली, सँडल फ्रान्सच्या चार्ट्रेस कॅथेड्रलपासून प्रेरित होती. हे सँडल सोने आणि हिरेजडित होते.
7/8

राणी एलिझाबेथ II ने तिच्या राज्याभिषेकाच्या दिवशी दोन सुंदर मुकुट घातले होते. सेंट एडवर्ड्स क्राउन आणि इम्पीरियल स्टेट क्राउन. सेंट एडवर्ड्स क्राउन हा सर्व मुकुटांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र आहे, या मुकुटाचे वजन अंदाजे 5 पौंड आहे आणि ते मौल्यवान धातूंनी बनलेले आहे.
8/8

राणी एलिझाबेथ II ने लाखो लोकांना भाषण दिले. ती भाषणादरम्यान म्हणाली, माझ्यामागे केवळ गौरवशाली परंपरा आणि हजार वर्षांपेक्षा जास्त इतिहास नसून, राष्ट्रकुल आणि साम्राज्याची जिवंत शक्ती आणि वैभवही आहे.
Published at : 06 May 2023 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
